पानगाव(बार्शी): येथील संत तुकाराम विद्यालयात इयत्ता दहावीसह विविध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार तथा शालेय समितीचे अध्यक्ष जयकुमार शितोळे,माजी सैनिक संघटनेचे दामोदर पवार माजी केंद्रप्रमुख प्रकाश नलवडे,बाबासाहेब कापसे,विद्याधर गव्हाणे,संतोष कानगुडे,पिंटू नाईकवाडी,प्रसाद पाटील,युवराज कांबळे,बालाजी पवार,अजित पाटील,तानाजी सगरे आदी उपस्थित होते.विद्यालयाच्या सभागृहात कोरोनाचे सर्व नियम पाळून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात विद्यालयातील दहावीतील गुणवंत मानसी लोंढे ९७.२० टक्के,श्रुती काळे ९५.८० टक्के,कांचन पवार ९५.०० टक्के,प्राची पाटील ९३.४० टक्के,ईश्वरी काळे ९३.२० टक्के , वैष्णवी पवार ९०.८० टक्के विश्वनाथ ठाकरे ९ ०.४० टक्के,वैभव पवार ८९.८० टक्के,राजनंदिनी गाडेकर ८९.०० टक्के या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.तसेच इयत्ता आठवी एनएमएमएस परीक्षेत यश मिळाल्याबद्दल सिद्धी पवार हिचाही पालकासह सत्कार करण्यात आला
यावेळी श्री. शितोळे यांनी विद्यार्थांना व पालकांना मार्गदर्शन करत संस्थेची शाळेची भविष्यातील ध्येयधोरणे स्पष्ट केली.कोरोना काळात शिक्षणक्षेत्रात शिक्षक व विद्यार्थ्यांकडून केल्या गेलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले.संस्थेच्या डिजिटल बोर्ड या महत्त्वाकांक्षी योजनेची देखील माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमास सचिन कापसे,सुभाष काळे, इंद्रजित काळे,दिपक ठाकरे,चंद्रकांत पवार,विजय पवार,राजेंद्र चव्हाण यांच्यासह पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.सूत्रसंचालन प्रमोद जाधव यांनी तर आभार मुख्याध्यापक पी.पी.पाटील यांनी मानले.
More Stories
राज्यात १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’
धाराशिव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ समिती प्रमुखांनी दिले प्रशिक्षण
बार्शी बसस्थानक व आगाराच्या पुनर्बांधणीसाठी १४ कोटी ९९ लाख ५० हजार मंजूर :- आमदार राजेंद्र राऊत