Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > पुण्याच्या माय लॅबच्या टेस्ट किटला मंजुरी घरीच करता येईल चाचणी

पुण्याच्या माय लॅबच्या टेस्ट किटला मंजुरी घरीच करता येईल चाचणी

मित्राला शेअर करा
कसे वापरायचे टेस्ट किट

कोरोना टेस्ट ( Corona test ) करण्याच्या सध्या दोन पद्धती आहेत एक म्हणजे आरटी – पीसीआर टेस्ट( RT – PCR TEST ) आणि दुसरी म्हणजे रॅपिड अँटिजेन टेस्ट( Rapid antigen test )आरटी – पीसीआर टेस्ट ही लॅबमध्ये केली जाते.तर रॅपिड अँटिजेन टेस्ट( RAT )की विविध ठिकाणी जाऊन केली जाते.ही टेस्ट तज्ज्ञांमार्फत किंवा प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत केली जाते.पण आता तुम्हीसुद्धा स्वतःची कोरोना टेस्ट करू शकता . लोकांना घरच्या घरी स्वतःची कोरोना चाचणी करता येईल अशा RAT टेस्टच्या किटला इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्चने ( ICMR ) मंजुरी दिली आहे COVISELF ( Pathocatch ) असं या किटचं नाव आहे . पुण्यातील माय लॅब डिस्कव्हरी सोल्युशन लिमिटेडने ही टेस्ट किट ( My Lab Discovery solution Ltd. ) तयार करण्यात आली आहे.या किटमार्फत लोक आपल्या नाकातील स्वब सॅम्पल घेऊन आपली चाचणी करू शकतील.