


पश्चिम बंगाल मध्ये सध्या यास चक्रीवादळा (Yaas)चा कहर सुरू आहे. ओडिशा आणि पश्चिम बंगाल किनारपट्टी भागात यास चक्रीवादळाचा परिणाम दिसण्यास सुरुवात झाली आहे.ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या अनेक किनारपट्टी भागात जोरदार पाऊस आणि वारा सुरू आहे.या चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता पश्चिम बंगाल आणि ओडिसाच्या किनारपट्टी भागातून भारतीय सैन्याच्या मदतीने लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची प्रक्रिया व बचावकार्य सुरू सुरु आहे.अनेक ठिकाणी रस्त्यावर पावसामुळे प्रचंड पाणी साचले आहे.यामुळे अनेक घरांवरचे छप्पर उडून गेलेत.वाऱ्याचा वेग ताशी १०० किलोमीटर आहे. यास चक्रीवादळाचे काही व्हिडिओ अणि फोटो समोर आले आहेत.
More Stories
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांना मिळणार १० दिवसांची अर्जित रजा – माजी आमदार दत्तात्रय सावंत
महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन