दि.२/५/२०२१ रोजी
बारामती येथे विश्व जन आरोग्य सेवा समिती व मराठा सहकार्य समुह यांनी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले
व कोरोना काळात आपले कर्तव्य करून प्रशासनास मदत केली. लस घेण्याअगोदर रक्तदान करावे यासाठी
कोरोणाच्या महामारी मुळे राज्यात रक्ताचा खूप तुटवडा होत आहे. राज्यात काहीच आठवडे रक्त पुरेल एवढेच रक्त शिल्लक आहे. ही गंभीर परिस्तिथी लक्षात घेऊन विश्व जन आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र व मराठा सहकार्य समुह यांच्या संयुक्त विद्यमाने माणिक बाई चंदुलाल सराफ ब्लड बँक, बारामती येथे रक्तदान शिबिर आयोजित केले होते. लाॅकडाऊनव बऱ्याच जणांनी लस घेतली आहे. वाढते कोरोना पेशंट ची भिती अशा अनेक कारणामुळे बर्याच रक्तदात्यांना रक्त देता येत नाही. हे लक्षात घेवून बारामती येथे रक्तदान शिबिर आयोजित केले. या रक्तदान शिबिरामध्ये दोन ते अडीच तासात ४७ रक्तदात्यांनी रक्तदान केले व आपले कर्तव्य निभावले. रक्तदान शिबिर आयोजन करणारे विश्व जन आरोग्य सेवा समिती आणि मराठा सहकार्य समुह चे पदाधिकारी सदस्य
मयुर छाया अंकुश चव्हाण, अभिजित ढवान, वैभव काटकर, प्रज्ञा काटे, निलेश माने, संभाजी माने, दिपक नवले, स्वप्नील तावरे, शेखर पवार, मयुर हिंगसे असे इत्यादी उपस्थित होते.
सर्व रक्तदात्यांचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले.
विश्वसनीय बातम्या अणि माहिती
More Stories
राज्यात १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’
धाराशिव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ समिती प्रमुखांनी दिले प्रशिक्षण
बार्शी बसस्थानक व आगाराच्या पुनर्बांधणीसाठी १४ कोटी ९९ लाख ५० हजार मंजूर :- आमदार राजेंद्र राऊत