मराठा आरक्षण लढ्याची गंभीरपणे दखल न घेणाऱ्या केंद्र व राज्यसरकारच निषेध म्हणून आज बार्शी शहरातील मराठा बांधवांनी आपल्या घरावरती काळे झेंडे लावून निषेध नोंदवला
व लवकरात लवकर कोणत्याही परिस्थितीत मराठा समाज्याला आरक्षण लागू करावे अन्यथा कोरोना विषाणूची परिस्थितीत सुधारल्या नंतर मराठा समाज तीव्र आंदोलन करून मराठा आरक्षण मिळवल्या शिवाय शांत बसणार नाही अशी भावना
अनेक मराठा बांधवांनी व्यक्त केली या आंदोलनामध्ये अनेक मराठा बांधव सहकुटुंब सहपरिवार सहभागी झाले, कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन ह्या पद्धतीने घरी राहून आंदोलन केले असं मराठा बांधवांकडून सांगण्यात आले भविष्यात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू असादेखील प्रशासनाला इशारा देण्यात आला.
विश्वसनीय बातम्या अणि माहिती
More Stories
लोकसेवा विद्यालयाच्या आदर्श कोल्हे याची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड
एसटीच्या नव्या लालपरीचा लूक अखेर आला समोर
शनिवारी १४ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परंड्यात