बार्शी: लायन्स क्लब ऑफ बार्शी टाऊन व लायन्स क्लब ऑफ बार्शी टाऊन तेजस्विनीचे नूतन अध्यक्ष, पदाधिकारी व त्यांचे संचालक मंडळाचा पदग्रहण व शपथविधी समारंभ आणि लिओ क्लब ऑफ बार्शी टाऊनचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
टाऊन च्या अध्यक्ष पदी अजित देशमुख,सचिव रवि राऊत तर खजिनदार म्हणून प्रितम सुरवसे
आणि तेजस्वीनीच्या अध्यक्षपदी शर्वरी फुरडे, सचिव पल्लवी बजाज आणि खजिनदार म्हणून प्रांजली कुलकर्णी यांना तर नव्याने स्थापन करण्यात आलेल्या युवकांच्या लिओ क्लबच्या अध्यक्षपदी पवन श्रीश्रीमाळ सचिव आदित्य सोनिग्रा तर खजिनदार म्हणून अक्षित परमार यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी आमदार राजेंद्र राऊत, नगराध्यक्ष असिफ तांबोळी, रिजन चेअरमनआझम शेख, उपविभागीय सभापती आनंद पुनमिया आदी उपस्थित होते.माजी प्रांतपाल उदय लोध व विजयकुमार राठी यांनी शपथ प्रदान अधिकारी म्हणून काम पाहिले.
अजित देशमुख म्हणाले की, क्लब च्या माध्यमातून सेवेची ठायी तत्पर रहात सामाजिक उपक्रम राबविण्याचा मनोदय व्यक्त केला. यामध्ये अन्नदान, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, युवक मेळावे व मधुमेह रुग्णांसाठी मोफत औषधोपचार असे कार्यक्रम घेऊ असे सांगितले.
शर्वरी फुरडे यांनी म्हणाल्या की, समाज गरजेतून उद्भावणाऱ्या सेवांची नियोजनबद्ध पूर्णता करून जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू.
लिओ क्लब चे अध्यक्ष पवन श्रीश्रीमाळ यांनी सांगितले बेघरांना मदत,पर्यवारण स्वछता , सैन्य कुटुंबांना मदत असे कार्य करण्याचा आमचा मानस आहे.
आ.राऊत म्हणाले की,बार्शीच्या सामाजिक जडणघडणी मध्ये लायन्स क्लब टाऊन चे महत्वपूर्ण योगदान आहे.कोरोना मुळे यंदा कृषी प्रदर्शनात खंड पडला असला तरी कोरोना कमी होताच पुन्हा प्रदर्शन घ्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली.लिओ क्लब च्या माध्यमातून तरुणांना ही सामाजिक कार्यात आणण्याचे काम ही आता हाती घेतले आहे हे कौतुकास्पद आहे.
सूत्रसंचालन वैभवी बुडूख आणि अर्चना आवटे यांनी केले.आभार रवी राऊत यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्लबच्या सर्व सभासदांनी परिश्रम घेतले.
More Stories
राज्यात १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’
धाराशिव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ समिती प्रमुखांनी दिले प्रशिक्षण
बार्शी बसस्थानक व आगाराच्या पुनर्बांधणीसाठी १४ कोटी ९९ लाख ५० हजार मंजूर :- आमदार राजेंद्र राऊत