Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती उभारणार 100 बेडचे कोवीड केअर सेंटर – चेअरमन रणवीर राऊत

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती उभारणार 100 बेडचे कोवीड केअर सेंटर – चेअरमन रणवीर राऊत

मित्राला शेअर करा

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सध्या मोठ्या प्रमाणात बार्शी शहर व तालुक्यात वाढत आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सामाजिक सेवा करण्याच्या उद्देशाने, कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी बाजार समितीच्या वतीने 100 बेडचे कोवीड केअर सेंटर फळे भाजीपाला मार्केट येथे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे चेअरमन रणवीर राऊत, संचालक रावसाहेब मनगिरे मालक, चंद्रकांत मांजरे यांनी दिली.

यावेळी या कोवीड केअर सेंटर मधील रुग्णांना माफक दरात औषधे देणार असल्याची माहिती केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर उर्फ आबासाहेब राऊत व जिल्हा कार्यकारिणी सदस्य अभिजित गाढवे यांनी केली.