Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १०० बेड कोवीड केअर सेंटरचे पणन महासंचालक मा.सतिश सोनी यांच्या हस्ते उद्घाटन

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १०० बेड कोवीड केअर सेंटरचे पणन महासंचालक मा.सतिश सोनी यांच्या हस्ते उद्घाटन

मित्राला शेअर करा

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने उभारण्यात आलेल्या १०० बेडच्या कोवीड केअर सेंटरचे ऑनलाईन उद्घाटन महाराष्ट्राचे पणन महासंचालक मा.सतिश सोनी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी आमदार राजेंद्र राऊत, प्रांताधिकारी हेमंत निकम, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, तहसीलदार सुनील शेरखाने, माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारबोले, नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळी, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक ढगे, पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, सहायक निबंधक अभय कटके, चेअरमन रणवीर राऊत, संचालक रावसाहेब मनगिरे उपस्थित होते.