बार्शी: राज्य सरकारच्या पर्यावरण संवर्धनासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियान राबिवण्यात आले होते. या अभियानात उल्लेखनीय कामगिरी बजावल्यामुळे बार्शीला उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देवून सन्मानीत करण्यात आलं आहे.
भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित पर्यावरणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आली.
या पारितोषिकाचे खरे मानकरी,बार्शी नगरपालिकेने विकसित केलेली विविध भागातील उद्याने याच बरोबर गुड माॅर्निग क्लब वृक्ष संवर्धन समिति बार्शी व जाणीव फाउंडेशन समिती तुळजापुर रोड बार्शी व बार्शी पंचक्रोशितिल वृक्ष प्रेमी यांना देणे उचित ठरेल
बार्शीला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया वृक्ष संवर्धन समितीतर्फे देण्यात आली.
बार्शी नगर पालिका,अशी एकमेव नगरपालिका आहे, जी अमृत शहरातून (महानगरपालिका गट) पारितोषिकास पात्र ठरली आहे.त्याबद्दल,आमदार राजेंद्र राऊत आणि नगराध्यक्ष एड.असिफ तांबोळी यांनी नगरपालिका कर्मचारी आणि बार्शीकर जनतेचे अभिनंदन केले.
More Stories
राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी पालकमंत्री जाहीर
तृतीयपंथीयांच्या जागतिक परिषदेसाठी बार्शीचे सचिन वायकुळे यांना निमंत्रण
उळे येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली