
बार्शी मधील डेवेलपर मयूर फरतडेला फेसबुक ने इंस्टाग्राम मधील एक बग शोधण्यासाठी 30,000 डॉलरचे बक्षीस दिले आहे . भारतीय चलनात हि रक्कम 22 लाखांच्या आसपास आहे,या बगचा वापर करून कोणीही इंस्टाग्राम युजरचे खाजगी फोटो त्यांना फॉलो न करता देखील बघू शकत होता.फेसबुकने हि चूक सुधारली आहे.
तात्यासाहेब कोरे इंजिनिअरिंग कॉलेज मधील तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या मयूर चे शिक्षण बार्शीतील महाराष्ट्र विद्यालय व शिवाजी कॉलेज येथे झाले आहे.
मयूरने Medium वर एक ब्लॉग पोस्ट करून याची माहिती दिली आहे.त्याने या बग संबंधित सविस्तर माहिती देखील या ब्लॉग पोस्टमधून दिली आहे.मयूरने फेसबुकच्या बग बॉउंटी प्रोग्रॅमच्या माध्यमातून या त्रुटीची माहिती 16 एप्रिलला दिली होती.कंपनीने 15 जूनपर्यंत हि चूक सुधारली आहे.मयूरने दिलेल्या माहितीनुसार,इंस्टाग्रामचा हा बग एखाद्या युजरला इंस्टाग्रामवर टार्गेटेड मीडिया दाखवू शकत होता.मीडिया आयडीची मदत घेऊन कोणत्याही युजरचे खाजगी आणि अर्काइव्ह केलेल्या पोस्ट,स्टोरी,रील आणि IGTV व्हिडीओज देखील बघता येत होते . त्याचबरोबर या पोस्टवरील लाईक्स,कमेंट्स,सेव्ह काउन्ट इतर माहिती देखील बघता येत होती.विशेष म्हणजे,असे करण्यासाठी त्या युजरला फोल्लो करणे आवश्यक नव्हते.पोस्ट पण त्यांना विना फॉलो करता पाहू शकत होतो.
अश्याच प्रकारे बग शोधणाऱ्यास गूगल ने देखील खूप मोठ्या रकमेचे बक्षीस जाहीर केले आहे.
More Stories
जिल्ह्यातील रुग्णालयांचा आयुष्मान भारत व महात्मा फुले योजनेत समावेशासाठी पुढाकार
मुलींच्या संरक्षण व सुरक्षिततेची जबाबदारी शाळेची, शिक्षकांनी आपल्या पाल्य प्रमाणे त्यांच्यावर संस्कार करावेत- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
सर्व यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 चा 935 कोटीचा निधी वेळेत खर्च करावा