
आरक्षणा संदर्भातील भविष्यातील आंदोलने तीव्र करणार — आमदार राजेंद्र राऊत
आज दिनांक 26 जून 2021 रोजी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस,प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील व भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख यांच्या आदेशानुसार व आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्त्वाखाली बार्शीतील पोस्ट चौक येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळ चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या गलथान कारभारामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण न्यायालयाच्या निर्णयाने स्थगित करण्यात आले. या आदेशाच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने शेकडो कार्यकर्त्यांनी पोस्ट चौक येथे चक्का जाम आंदोलन केले.या वेळी आमदार राजेंद्र राऊत म्हणाले की जे ओबीसी समाजाचे 27% आरक्षण होते ते जसेच्या तसे ठेवावे, अन्यथा यापुढील आंदोलन तीव्रपणे करण्यात येईल.
त्याचबरोबर मराठा समाजाचे आरक्षण मा. सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले,आघाडी सरकारने मा. न्यायालयात खंबीरपणे बाजू मांडली नाही त्यामुळेच हेही आरक्षण रद्द झाले. यामुळे भविष्यात मराठा समाजास रस्त्यांवर उतरण्याची वेळ आली आहे.
त्याचबरोबर मागासवर्गीय पदोन्नती रद्द निर्णयामुळे, आघाडी सरकारला मागासवर्गीय समाजाच्या रोषास सामोरे जावे लागत आहे.
या आंदोलनामध्ये नगराध्यक्ष ॲड.आसिफभाई तांबोळी,पंचायत समिती सभापती अनिल काका डिसले, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष कौरव आप्पा माने,जेष्ठ माजी नगरसेवक अशोक सावळे, सोलापूर जि. प. सदस्य तथा भाजपा तालुका अध्यक्ष मदन दराडे, शहर अध्यक्ष महावीर कदम, पक्षनेते विजय नाना राऊत, प्रशांत कथले, प्रमोद वाघमोडे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष केशव घोगरे,भाजपा महिला उपाध्यक्ष ॲड.राजश्रीताई डमरे,शहराध्यक्ष सौ.रूपालीताई ढगे, सौ.पद्मजाताई काळे,गटनेते दीपक राऊत,आरोग्य सभापती संदेश काकडे, पाणीपुरवठा सभापती भैय्या बारंगुळे,विजय चव्हाण, महेश जगताप, mजि. प. सदस्य समाधान डोईफोडे, पंचायत समिती माजी उपसभापती अविनाश मांजरे,धनंजय जाधव, भाजपा तालुका उपाध्यक्ष नानासाहेब धायगुडे, वैराग ब्लॉक अध्यक्ष शिवाजी सुळे,भाजपा अल्पसंख्याक सेल तालुका अध्यक्ष शकील मुलाणी,ओबीसी सेल तालुका तालुका अध्यक्ष विजयकुमार माळी,भाजपा किसान मोर्चा अध्यक्ष व्यंकटेश ढेंगळे-पाटील, भाजपा तालुका प्रसिद्धी प्रमुख प्रशांत खराडे,किरण कोकाटे,वैभव शिंदे आदी उपस्थित होते.
चक्काजाम आंदोलनानंतर तहसीलदार सुनील शेरखाने साहेब यांनी आंदोलनाच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले.
More Stories
महाराष्ट्र विद्यालयात नवीन प्रवेश घेतलेल्या इयत्ता पाचवी मधील विद्यार्थ्यांच्या पालकांची शिक्षक-पालक सभा उत्साहात संपन्न
जिजाऊ गुरुकुल खांडवीला राज्यस्तरीय The Best School Award
आज ११ वाजता बार्शी तालुक्यातील ग्रामपंचायत आरक्षण सोडत कार्यक्रम