राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे . राज्यात शनिवार आणि रविवारी कडकडीत बंद राहणार असल्याची माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी लाइव्ह द्वारे दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल असे स्पष्ट केले होते त्या नंतर अनेक व्यापारी संघटनांशी चर्चा करण्यात आल्यानंतर आज संबधित अधिकारी व मंत्र्यांची बैठक बोलावून लॉकडाऊनबाबत चर्चा केली . त्यात राज्यात विकेंड लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला . राज्यात शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून लॉकडाऊन सुरू होईल . तो सोमवारी सकाळी संपेल . दर आठवड्याला शनिवार आणि रविवारी राज्यात कडकडीत बंद राहणार आहे फक्त यातून अत्यावश्यक सेवा वगळण्या आल्या आहेत. जिल्हा बंदीचा निर्णय घेतलेला नाही
विश्वसनीय बातम्या अणि माहिती
More Stories
राज्यात १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’
धाराशिव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ समिती प्रमुखांनी दिले प्रशिक्षण
बार्शी बसस्थानक व आगाराच्या पुनर्बांधणीसाठी १४ कोटी ९९ लाख ५० हजार मंजूर :- आमदार राजेंद्र राऊत