Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > महाराष्ट्र विद्यालय,बार्शी येथे प्राचार्य,शिक्षक व वरिष्ठ लिपिक यांचा सेवावृत्ती निमित्त सत्कार

महाराष्ट्र विद्यालय,बार्शी येथे प्राचार्य,शिक्षक व वरिष्ठ लिपिक यांचा सेवावृत्ती निमित्त सत्कार

मित्राला शेअर करा

महाराष्ट्र विद्यालय,बार्शी येथे प्राचार्य,शिक्षक व वरिष्ठ लिपिक यांचा सेवावृत्तीचा कार्यक्रम पार पडला
आज दिनांक ३१ मे २०२१ रोजी मा. प्राचार्य श्री.डी.बी.पाटील तसेच विद्यालयातील सहशिक्षक श्री.आर.एस.जाधव व वरिष्ठ लिपिक श्री.टी.एस.मोरे हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.
यावेळी सर्व सत्कार मूर्तींचा सत्कार बार्शीचे ग्रामदेवत श्री भगवंतांची प्रतिमा,शाल, जगदाळे मामांच्या जीवनावर आधारित पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.सत्कार मूर्तींचे सत्कार पुढील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. श्री.शि.शि.प्र.मंडळाचे जनरल सेक्रेटरी श्री.व्ही.एस.पाटील सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.जयकुमार शितोळे बापू व संस्था सदस्य श्री.अरुण देबडवार काका
यावेळी उपप्राचार्य श्री एल.डी.काळे,पर्यवेक्षक श्री.जी.ए.चव्हाण,किमान कौशल्य विभाग प्रमुख श्री.एस.एन. भंडारी, श्री.अतुल नलगे,शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी कोविड-19 चे नियम पाळून उपस्थित होते.तसेच राहिलेल्या सर्व शिक्षकांनी ऑनलाईन उपस्थित दाखविली.
या कार्यक्रमामध्ये विद्यालयातील सर्व शिक्षकांच्या वतीने श्री आर.बी. गोणेकर (क.म.शिक्षक) यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.एल.डी.काळे यांनी केले.
सत्कार मूर्तींचा परिचय श्री.किरण गाढवे यांनी करून दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.संग्राम देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन श्री.एस.एल.देशमुख यांनी केले.