Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > महाराष्ट्र विद्यालय बार्शी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

महाराष्ट्र विद्यालय बार्शी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

मित्राला शेअर करा

श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ,बार्शी. संचलित,महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथे दिनांक १/८/२१ रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमात अंतर्गत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी सांगता वर्ष साजरे करण्यात आले. त्याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ बी.वाय.यादव साहेब हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे खजिनदार श्री जयकुमार शितोळे,संस्था सदस्य श्री पी.बी.लोखंडे,श्री बी.के.भालके हे होते. सोबत प्राचार्य जी.ए.चव्हाण, उपप्राचार्य एल.डी.काळे,प्रा.श्रीपाद भंडारी, प्रा.किरण गाढवे हे होते.

याप्रसंगी माननीय श्री जयकुमार शितोळे यांनी अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या कार्याची माहिती दिली तसेच डॉ बी.वाय.यादव यांनी या महापुरूषांना विनम्र अभिवादन केले व कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रम प्रसंगी सापताळे सर,शशिकांत लांडगे,सुहास वाघमारे,अनिल पाटील,आनंद कसबे,महेश माने,सुरेश डिसले,स्वप्नील पाटील,अतुल नलगे,रमेश चौरे सर,रमाकांत बोरगांवकर सर,मेनकुदळे मॅडम,शिकलगार सर,उमेश क्षिरसागर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कसबे सरांनी तर आभार प्रदर्शन प्रा.किरण गाढवे यांनी केले.