Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या पत्नी आनुराधा ढोबळे यांचे निधन

माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या पत्नी आनुराधा ढोबळे यांचे निधन

मित्राला शेअर करा

सोलापूर : माजी आमदार तथा माजी पाणीपुरवठामंत्री ,उच्च शिक्षण मंत्री प्रा लक्ष्मण ढोबळे यांच्या सुविद्य पत्नी अनुराधा लक्ष्मण ढोबळे यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने पुणे येथील एका रुग्णालयात दि ४ मे रोजी पहाटे निधन झाले. मृत्यूसमयी त्या ५८ वर्षाच्या होत्या.

‘सावली’ वुमेन्स फाउंडेशन च्या त्या अध्यक्षा होत्या. त्यांच्या पश्चात पती माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, मुलगा अभिजीत ढोबळे, सून शारोन अभिजीत ढोबळे, दोन मुली क्रांती आवळे व कोमल साळुंखे तसेच जावई अब्राहम आवळे, अजय साळुंखे व नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या मनमिळाऊ व प्रेमळ स्वभावाच्या होत्या. त्यांच्या जाण्याने शाहू परिवार व महात्मा फुले सूत गिरणी परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.