बार्शी:येथील लायन्स क्लबचे नूतन अध्यक्ष ॲड.विकास जाधव,सचिव संतोष जोशी तर खजिनदार अल्ताफ शेख यांनी शपथ घेऊन पदभार घेतला.यावेळी प्रमख उपस्थिती म्हणून माजी मंत्री दिलिप सोपल,नगराध्यक्ष असिफ तांबोळी,जितेंद्र जोशी,झोन चेअरमन नंदकुमार कल्याणी उपस्थिती होते.
यावेळी नविन संचालक मंडळमध्ये प्रथम अध्यक्ष प्रशांत पंडित,अक्षय बंडेवार,महेंद्र कथले,गिरीश शेटे,ओंकार शहाणे,गोविंद तापडिया,बापूसाहेब कदम,गोवर्धनदास जाजू,जयप्रकाश भराडीया, अॅड.दिनेश श्रीश्रीमाळ,डॉ.अतुल कुंभारे,डॉ.केशवराज मुळे,राहुल साखरे,नितीन कौलवार,सी.ए.विजय गापट,रविंद्र कसपटे,लखन राजपूत,गणेश लामतुरे,अनिल देशपांडे, यांनाही संचालक मंडळ म्हणून पदभार स्वीकारला.
ॲड.विकास जाधव यांनी यापूर्वी बार्शी वकील संघाचे अध्यक्ष,कळंबवाडीचे सरपंच,सरपंच परिषद जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हासरचिटणिस,राष्ट्रवादी काँग्रेस लिगल सेलचे जिल्हाध्यक्ष व प्रदेश सरचिटणीस ढाळेपिंपळगाव पाणि बचाव समिती अध्यक्ष,दिलिप फौंडेशनच्या अध्यक्ष,सरपंच परिषदेचे प्रदेश सरचिटणीस असे विविध पदावर काम केलेला अनुभवी अध्यक्ष भेटल्याचे सर्व लायन्स क्लबच्या सदस्यांनी सांगितले.
यावेळी क्लबचे अध्यक्ष जाधव यांनी सांगितले की,लायन्स क्लबच्या पूर्वीच्या सर्व अध्यक्षांनी क्लबची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मी ही भविष्यात ती ऊंची कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करेन.तसेच गावपातळीवर विविध वृक्षारोपण,शालेय साहित्य,तरुणांना योग्य मार्गदर्शन व व्यवसायिक प्रशिक्षण,रक्तदान शिबिर,आरोग्य शिबीर,ग्रामस्वच्छता अभियान असे समाजपयोगी कामे करणार असल्याचे यावेळी सांगितले.
माजी मंत्री सोपल म्हणाले लायन्स क्लब बार्शीला 47 वर्षांचा इतिहास आहे.नूतन अध्यक्ष अॅड .विकास जाधव व त्यांचे संचालक मंडळ निश्चित चांगले काम करेल.ड.जाधव समाजकारण,राजकारण आणि वकील म्हणून तळमळीने काम करणारे आहेत.त्यांची झालेली निवड योग्य आहे ते पदाला साजेसं काम करतील
More Stories
राज्यात १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’
धाराशिव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ समिती प्रमुखांनी दिले प्रशिक्षण
बार्शी बसस्थानक व आगाराच्या पुनर्बांधणीसाठी १४ कोटी ९९ लाख ५० हजार मंजूर :- आमदार राजेंद्र राऊत