
मॉंसाहेब जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन व अनावरण आमदार नरेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनी, स्वर्गीय आण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष व आमदार नरेंद्र पाटील यांच्या हस्ते या फोटोचे पूजन व अनावरण करण्यात आले. यावेळी आमदार राजेंद्र राऊत,मर्चंट असोसिएशनचे सचिव महेश करळे, प्रविण गायकवाड, सचिन मडके उपस्थित होते.
आमदार राजेंद्र राऊत यांनी, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शासकीय इमारतींवरील वैयक्तिक त्यांचे व कुटुंबातील व्यक्तींचे फोटो हटविण्याची विनंती करून त्या जागी छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो लावण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या विनंतीनुसार बाजार समितीच्या कार्यालयातील त्यांचा फोटो हटवून, त्या ठिकाणी मॉंसाहेब जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो लावण्यात आलेला आहे.
More Stories
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वाहने उभा करून माननीय उपमुख्यमंत्री महोदय श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे चालत निघाले
जिल्ह्यातील रुग्णालयांचा आयुष्मान भारत व महात्मा फुले योजनेत समावेशासाठी पुढाकार