मोहोळ प्रतिनिधी-मोहोळ येथे सुसज्ज शासकीय डेडीकेटेड कोविड केअर हॉस्पिटल ( DCHC ) कार्यरत न झाल्यास आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन अॅड. श्रीरंग दत्तात्रय लाळे यांनी प्रशासनाला दिले आहे.. या निवेदनात त्यांनी म्हटले आहेकी, १०४ गावे व एक नगरपरिषद असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात एकही शासकीय डेडिकेटेड कोविड केअर सेंटर नाही . तालुक्याचा मृत्युदर हा झपाट्याने वाढत आणि आणि त्याला कारण म्हणजे तालुक्यात एकही DCHC नाही . त्यामुळे रुग्ण घरीच उपचार घेतल्याने मोठ्या प्रमाणावर दगावत आहेत . ही बाब अत्यंत चिंताजनक आहे . त्यामुळे मोहोळ तालुक्यात DCHC करावे या मागणीसाठी आपल्याला याआधी वारंवार इमेल करून , निवेदन देऊन व प्रत्यक्षात भेटून तसेच मा . तहसिलदार श्री.जीवन बनसोडे यांना फोन वरून संपर्क करून विनंती केलेली होती व आहे .अद्याप यासंदर्भात आपल्या कार्यालायकडून कोणतीही कार्यवाही झालेली दिसून येत नाही किंवा तसे पत्र , ई – मेल अद्याप आलेला नाही . दि .२४ / ०४ / २०२१ रोजी मोहोळ पंचायत समिती येथे मिटिंग झाली असता पालकमंत्री श्री.दत्तात्रय भरणे साहेब , मोहोळचे आमदार श्री.यशवंत माने साहेब , सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.दिलीप स्वामी यांनी १ मे २०२१ रोजी मोहोळ येथे सर्व कोविड उपचारांनी सुसज्ज व २५ प्राणवायू उपलब्ध असणारे डेडिकेटेड कोविड केअर सेंटर उभारणार असल्याचे व त्या दिवशी पासून रुग्णांना उपचार देणार असल्याचे सांगून उपोषण स्थगित करण्याच्या संदर्भात चर्चा केलेली होती . त्यानुसार १ मे पर्यंत आमरण उपोषण स्थगित केले होते . परंतु १ मे रोजी मदरच्या हॉस्पिटलचे उद्घाटन होऊन तेथे उपचार सुरु न झाल्यास १ मे दुपारी चार वाजल्यापासून पुढे आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे सदरच्या निवेदनाच्या अनुषंगाने जर १ मे २०२१ च्या आत सर्व कोविड उपचारांनी सुसज्ज व २५ प्राणवायू उपलब्ध असणारे डेडिकेटेड कोविड केअर सेंटर न सुरु झाल्यास मोहोळ तहसिलदार कार्यालय समोर आमरण उपोषण करणार असल्याचे सदरच्या निवेदन पत्राद्वारे कळविण्यात त्यांनी कळविले आहे आहे . प्रशासनाच्या कायम सहकार्याच्या भूमिकेत असतो आणि अजूनही आहे . परंतु मोहोळ तालुक्यातील रुग्णांचे मृत्यदर व हालअपेष्टा बघता आणि या परिस्थितीचा वेळोवेळी संदर्भ देऊनही उपाययोजना होत नसतील तर सदरचे महात्मा गांधीजी यांनी अवलंबिलेल्या सविनय कायदेभंगाच्या मार्गाने आमरण उपोषण आवश्यक आहे . तरी येत्या ०१/०५/२०२१ रोजी दुपारी चार वाजलेपासून आमरण उपोषणाम सुरुवात करण्यात येईल याची प्रशासनाने दखल घ्यावी.असा इशारा अॅड.श्रीरंग लाळे यांनी दिला आहे.
विश्वसनीय बातम्या अणि माहिती
More Stories
बार्शी बसस्थानक व आगाराच्या पुनर्बांधणीसाठी १४ कोटी ९९ लाख ५० हजार मंजूर :- आमदार राजेंद्र राऊत
तेर येथील नृसिंह नवरात्र महोत्सवाच्या रक्तदान शिबिरात 67 भक्तांचे रक्तदान
महाराष्ट्र विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती धावणे के.डी.मॅडम यांना ‘लायन्स क्लब बार्शी रॉयल तर्फे राष्ट्र शिल्पकार आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान