आज राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या स्मृतिदिनी, मॉर्निंग सोशल फाउंडेशनच्या वतीने छेडा प्लॉट येथील जिजाऊ कॉलनी येथे राजमाता माँसाहेब जिजाऊ यांना अभिवादन करून २० रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले असून यामध्ये वड, कडूलिंब,पिंपळ व कारंजा अश्या देशी रोपांचा समावेश आहे.
यावेळी मॉर्निंग सोशल फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष व पक्षनेते विजय नाना राऊत नगरसेवक विजय चव्हाण, संदेश काकडे,स्थानिक रहिवाशी व मॉर्निंग सोशल फाउंडेशन चे सदस्य उपस्थित होते.
वृक्षारोपण वृक्ष संवर्धन व ऑक्सिजनचे महत्त्व लोकांना आता लक्ष्यात येत आहे परंतु बार्शी शहरात मात्र मॉर्निंग सोशल फाऊंडेशन वृक्ष संवर्धन समीती यांनी याचे महत्त्व पूर्वीच ओळखून शहर व परिसरात वृक्षारोपणाचे कार्य सुरू केले आहे त्याचा परिणाम आज शहरातील रस्त्यांवर दुतर्फा असणारी हिरवीगार झाडे ऑक्सिजन व सावली देण्याच काम करतायत.
या कामात स्थानिक रहिवाशांचा सहभाग सुद्धा कौतुकास्पद आहे.
More Stories
बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन
दीक्षारंभ कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांची सिताफळ संशोधन केंद्रला भेट