महाविकास आघाडी सरकारचा निर्णय… शिवप्रेमींकडुन स्वागत
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सहा जुन हा दिवस येथुन पुढे राज्यात शिवस्वराज्य दिन म्हणुन साजरा करण्याचा निर्णय राज्याच्या ग्रामविकास विभागाने घेतला आहे. आगामी सहा जुन पासुन राज्यातील सर्व जिल्हा परिषदा,पंचायत समित्या,ग्रामपंचायती च्या शासकिय इमारतीसमोर शिवशक राजदंड स्वराज्य गुढी म्हणुन ऊभा केला जाणार आहे. तसे लेखी आदेश सर्व सबंधित विभागाला देण्यात आले आहेत.
या स्वराज्य गुढी साटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पंच चिन्हांचा वापर केला आहे. भगवा ध्वजावर महाराजांचा जिरोटोप , वाघनख्या, राजमुद्रा,सुवर्ण होन. जगदंब तलवार अशी प्रतिके त्या भगव्या झेंड्यावर असणार आहेत. असा भगवा ध्वज स्थानिक स्वराज संस्थेतील सर्व इमारतीसमोर सहा जुन रोजी सकाळी नऊ वाजता फडकवुन त्यास मानवंदना देण्याचा लेखी आदेश ग्रामविकास विभागाचे सचिव पी के जाधव यांनी दिला आहे.
या निर्णयाचे स्वागत सर्व स्तरातुन होत आहे. अनेक शिवप्रेमी इतिहासकार विचारवंत तसेच पुरोगामी संघटनांनी या निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन हा गावागावात साजरा होणार आहे. ज्या ग्रामपंचायती व पंचायत समिती हा शिवस्वराज्य दिन साजरा करणार नाही त्यांच्यावर कारवाई देखील केली जाणार आहे.
१९ डिसेंबर २०१६ रोजी पुणे जिल्हा परिषदेने सर्व प्रथम हा निर्णय जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच सर्व ग्रामपंचायतींना लागु केला होता.त्यानंतर हा निर्णय आत्ता राज्यातील सर्व जिल्ह्यांना लागु केला गेला आहे.
ध्वजसहिंता अशी असणार
ध्वजासाटी ऊच्च प्रतीची जरीची पताका वापरावी.
ध्वज हा तीन फुट रुंद व सहा फुट लांबीचा असावा
महाराजांच्या पंचशुभ चिन्हांनी ध्वज अलंकृत करावा.
ध्वजासाटी पंधरा फुट लांबीचा बांबु अथवा लोखंडी पाईप वापरावा.
ध्वजस्तंभवर सुवर्ण लाल रंगाची गुंडाळी असावी.
ध्वज सकाळी नऊ वाजता फडकवण्यात येईल तर सुर्यास्तानंतर ध्वज सन्माने खाली ऊतरवण्यात येईल.
More Stories
‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ या मतदान जनजागृतीचा उद्या राज्यस्तरीय शुभांरभ
कार्यकर्त्यांनी स्वता उमेदवार समजून जोमाने कामाला लागावे. आ. राणाजगजितसिंह पाटील
गोरोबा काकांच्या पालखी सोहळ्याचे ” ३ नोव्हेंबरला ” पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान