Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > रेमिडीसिवीर नंतर म्युकरमायकोसीस वरील अम्फोटेरीसिन (Lyophilized) इंजेक्शन्सचा तुटवडा

रेमिडीसिवीर नंतर म्युकरमायकोसीस वरील अम्फोटेरीसिन (Lyophilized) इंजेक्शन्सचा तुटवडा

मित्राला शेअर करा

रेमिडीसिवीर नंतर म्युकरमायकोसीस वरील अम्फोनेक्स,अम्फोटेरीसिन B (Lyophilized) इंजेक्शन्सचा तुटवडा निर्माण झाल्याने या पार्श्वभूमीवर
खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल असणार्‍या म्युकरमायकोसीस च्या रुग्णांना अम्फोटेरीसिन B उपलब्ध करुन देणेबाबत चे आदेश आयुक्त,आरोग्य सेवा तथा संचालक,राष्ट्रीय आरोग्य अभियान,मुंबई यांनी दिले आहेत राज्यामध्ये म्युकरमायकोसीस या आजाराचे रुग्ण मोठया प्रमाणात आढळुन येत आहेत.या रुग्णांच्या उपचारासाठी अम्फोटेरीसिन B या इंजेक्शन्स ची आवश्यक आहे.सध्या या औषधाचा तुटवडा आहे . आरोग्य विभागामार्फत सध्या अम्फोटेरीसिन B इंजेक्शन्सची खरेदी करुन सर्व जिल्हयांना पुरवठा करण्यात येत आहे.तथापि खाजगी मेडिकल स्टोअर मध्ये औषधे उपलब्ध नसल्यामुळे खाजगी रुग्णालयात दाखल रुग्णांनाही ही औषधे पुरविण्यात यावीत अशी विनंती बऱ्याच जिल्हयांकडुन होत आहे . त्या संदर्भाने खालीलप्रमाणे कार्यवाही करावी.
१ )जिल्हयातील खाजगी वितरकांकडे उपलब्ध अम्फोटेरीसिन B चे आवश्यतेनुसार म्युकरमायकोसीसच्या रुग्णांच्या प्रमाणात वाटप जिल्हयाधिकारी यांच्या सल्ल्याने करण्यात यावी . २ )म्युकरमायकोसीस उपचार करणाऱ्या खाजगी रुग्णालयांनाच अम्फोटेरीसिन B उपलब्ध करुन दयावे .
३ )रुग्णांना संपुर्ण डोससाठी लागणारी औषधी एकाच वेळी रुग्णांना / रुग्णालयात देवु नये.प्रत्येक वेळी एक किंवा दोन दिवसाची मात्रा रुग्णालयास उपलब्ध करुन दयावी.
४ ) शासकीय रुग्णालयात पुरेसा साठा असेल तरच खाजगी रुग्णालयांना देण्यात यावा.
५ )साठा उपलब्ध करुन दिल्यास औषधाच्या किंमतीएवढी रक्कम खाजगी रुग्णालयाकडुन जिल्हा आरोग्य सोसायटीच्या कोविड -१९ खात्यामध्ये जमा करुन घ्यावी व त्यानंतरच औषधाचे वितरण करावे.उपरोक्त सुचनांनुसार कार्यवाही करावी अशाप्रकारच्या सूचना वितरण करावे आयुक्त, आरोग्य सेवा तथा संचालक , राष्ट्रीय आरोग्य अभियान , मुंबई यांनी दिल्या आहेत.

काल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्युकरमायकोसीस
आजारावरील उपचारासाठी आवश्यक असलेले इंजेक्शन उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आज ५००० इंजेक्शन प्राप्त झाले असून त्याचे वितरण करण्यात आले असून हाफकिन महामंडळाच्या माध्यमातून १ लाख इंजेक्शन खरेदीची प्रक्रिया सुरू असल्याचे जालना येथील पत्रकार परिषदेत सांगितले होते.