व्हिडीओ ☝
मराठा आरक्षण रद्द , सुप्रीम कोर्टाचा निर्णय मराठा आरक्षण रद्द करण्यात आले आहे . सर्वोच्च न्यायालयाने आज हा निर्णय दिला आहे . विनोद पाटील यांनी ही माहिती दिली आहे . राज्य सरकारने मराठा आरक्षण देण्यासंदर्भात कायदा बनवला होता . त्याला मुंबई हायकोर्टानेही मंजुरी दिली होती . मात्र आज सर्वोच्च न्यायालयाने हा कायदा रद्द केला आहे . मराठा आरक्षणासंदर्भातील गायकवाड समितीच्या शिफारसी स्वीकारण्याजोग्या नाहीत , असं सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे .
सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात म्हटले आहे की मराठा आरक्षण देताना ५० % आरक्षणाचा भंग करण्याचे कोणतेही योग्य कारण नाही.
छत्रपती उदयनराजे व संभाजी राजे यांनी सुपर न्युमररी आरक्षण देणं हाच आता मराठा समाजाला न्याय देण्यासाठी एकमेव पर्याय आहे.हा पर्याय सरकार ने तात्काळ लागू करावा.’ असा पर्याय त्यांनी सुचवलं आहे.
आरक्षणाबाबतचा तातडीचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपतींनीच घ्यावा’ अशी हात जोडून विनंतीच मुख्यमंत्र्यांनी केली आहे.यानिमित्ताने कुणी महाराष्ट्राचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू नयेत. जनतेने उगाच डोकी भडकवून घेवू नये असे ही उद्धव ठाकरे म्हणाले.
अजित पवार यांनी न्यायालयाचा निर्णय अनाकलनीय असून याची भरपाई राज्य शासन करेल अशी प्रतिक्रिया दिली.
देवेंद्र फडणवीस यांनी राज्यशासनाने आपली बाजू मांडताना ५०% च्या वर आरक्षण दिले पाहिजे हे पटवून देता आले नाही व समन्वयाचा अभाव असल्याची प्रतिक्रिया दिली.
सोशल मीडिया वर तरुणांच्या तीव्र प्रतिक्रिया पाह्यला मिळत आहेत
More Stories
‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ या मतदान जनजागृतीचा उद्या राज्यस्तरीय शुभांरभ
कार्यकर्त्यांनी स्वता उमेदवार समजून जोमाने कामाला लागावे. आ. राणाजगजितसिंह पाटील
गोरोबा काकांच्या पालखी सोहळ्याचे ” ३ नोव्हेंबरला ” पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान