Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > विश्व जन आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र राज्य धाराशिव व विश्व मराठा संघ महाराष्ट्र राज्य धाराशिव मार्फत भूम येथे रक्तदान शिबिर

विश्व जन आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र राज्य धाराशिव व विश्व मराठा संघ महाराष्ट्र राज्य धाराशिव मार्फत भूम येथे रक्तदान शिबिर

मित्राला शेअर करा

कोराना काळात रक्ताचा तुटवड्याची जाणीव ठेवून विश्व जन आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र राज्य धाराशिव व विश्व मराठा संघ महाराष्ट्र राज्य धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक ०५/०४/२०२१ रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले .

मा.ढवळशंखसाहेब गट विकास अधिकारी , मा.शिवाजी ( आण्णा ) भडके सभापती , पंचायत समिती भूम , मा.बालाजी गुंजाळ उपसभापती पंचायत समिती भूम , मा.वाघमारेसाहेब विस्तार अधिकारी , मा.इंगळे साहेब विस्तार अधिकारी , मा.शिंदे साहेब ग्रामसेवक पंचायत समिती भूम , संतोष बनसोडे तालुकाध्यक्ष ग्रामसेवक संघटना तसेच ताई लांडे या मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज , जिजाऊ व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन रक्तदानास सूरुवात केली .

या शिबिरात मा.ढवळशंख साहेब गटविकास अधिकारी पंचायत समिती भूम , मा.हनुमंत पाटुळे राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष भूम व ग्रामसेवक यांनी रक्तदान केले . यावेळी सोमनाथ कोकाटे जिल्हा समन्वयक विश्व जन आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र राज्य धाराशिव तथा जिल्हाध्यक्ष सोमनाथ कोकाटे , किशोर गटकळ तालुका समन्वयक विश्व जन आरोग्य सेवा समिती भूम , अर्चनाताई माने महिला जिल्हाध्यक्ष विश्व मराठा संघ धाराशिव , दादासाहेब दळवी कार्याध्यक्ष आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते .