Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > वैरागकरांची प्रतीक्षा संपली वैरागला नगर पंचायतीचा दर्जा

वैरागकरांची प्रतीक्षा संपली वैरागला नगर पंचायतीचा दर्जा

मित्राला शेअर करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी मंत्रालयात वैराग ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये करत असल्याची अधिकृत घोषणा केली.या घोषणेच पत्र वैरागचे राष्ट्रवादीचे नेते निरंजन भूमकर यांना यावेळी देण्यात आले . याप्रसंगी जलसंपदामंत्री जयंत पाटील , संजय शिंदे . यशवंत माने आमदार , दीपक साळुखे पाटील उमेश पाटील,उत्तमराव जानकर , कल्याणराव काळे,बालाजी पवार आदी उपस्थित होते . या घोषणेमुळे अनेक दिवसांपासूनची असणारी वैरागकरांची नगरपंचायतीची मागणी पूर्ण झाली आहे.या घोषणेची वार्ता समजताच वैरागकरांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला .