
चिपळूण शहर पूर्ण पाण्याखाली गेलं आहे वाशिष्टी नदीला आलेला पूर आणि कोयनेच वीज बनवून सोडलेलं पाणी एकत्र झाल्यावर पात्र सोडून शहरात घुसते दरवर्षी थोडया फार प्रमाणात असं होत पाऊस कोकणकरांना नवीन नाही पण आता पाऊस खूपच जास्त झाला आहे.
धक्कादायक घटना. कालपासूनजोरदार पडत असलेल्या पावसामुळे बावनदी आलेल्या महापुरामुळे कासार कोळवन पुल वाहून गेला आहे . त्यामुळे आजूबाजूच्या दहा गावासह तालुक्याचा संपर्क तुटला आहे.
या वर कायम स्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे.हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकले आहेत.त्यांना मदतीची आवश्यकता आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर ‘एनडीआरएफ’च्या २ टीम रवाना झाल्या.नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे कार्य वेगाने सुरु आहे.कोस्टल गार्डच्या मदतीने बोटी तसेच फूड पॅकेट्स व इतर वैद्यकीय सहकार्य उपलब्ध करण्यात येत आहे.बचाव दलाचे जवान व हेलिकॉप्टर रवाना झाले आहेत.
More Stories
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदवाढ
संत गोरोबाकाका मंदिराची प्रस्तावित नवीन कमान महाद्वाराची जागा बदलण्याची तेर ग्रामस्थांची मागणी