शंभुराजे प्रतिष्ठान बार्शी हे प्रत्येक वेळेस वेगवेगळे समाजकार्य व समाज उपयोगी निर्णय आजपर्यंत घेत आलेले आहे.आज दिनांक २७/७/२०२१ प्रतिष्ठानचे विश्वासू सदस्य श्री मोहित (दादा) रामदास मांजरे यांच्या वाढदिवसासाठी होणारा खर्च टाळूत सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी वाढदिवसाचा सर्व खर्च डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह या ठिकाणी असलेल्या कोरोना रुग्णांना उपयोगी साहित्य आणि फळे वाटप करण्यासाठी उपयोगात आणला.
अशा पद्धतीने त्यांनी आपला वाढदिवस कोरोना रुग्णांना मदत करुन साजरा केला.याचबरोबर
शंभुराजे नगर या ठिकाणी दुतर्फा झाडे लावण्यात आली.
याप्रसंगी डॉ.गणेश वाघमारे,दिनेश धुमाळ, रामनाथ आंधळे, विशाल चव्हाण,वाघमारे सिस्टर, वैभव नवलकारे सोबत शंभुराजे प्रतिष्ठान चे अध्यक्ष नितीन धस,मोहित मांजरे, ज्योतीराम कदम,सागर मोरे,अनिल जैंद,रवींद्र जाधव,निलेश मांजरे,अमोल पाटील,रवी जाधव,ऋषिकेश कदम, मानव चव्हाण,अतुल नलगे,अमित तपिसे, ऋषिकेश जाधव,विकी डोईफोडे,राहुल डोईफोडे, आकाश सांगडे,विनायक चौधरी,महावीर धारीवाल,रोहन जाधव,पारस धारीवाल,मनोज शिंगनाथ, विठ्ठल कुऱ्हाडे व शंभूराजे प्रतिष्ठानचे सर्व सदस्य व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
More Stories
बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन
पुण्याच्या एमआयटी विद्यापीठाचा जेष्ठ संपादक राजा माने यांना ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर