वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवार आणि रविवारी जाहीर केलेला बाजारपेठ बंदचा निर्णय हा व्यापारी वर्गाचे कंबरडे मोडणारा आहे . त्यामुळे हा निर्णय मागे घेण्यात यावा , अशी मागणी बार्शी व्यापारी महासंघाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे . व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुभाष लोढा म्हणाले , जिल्हाधिकारी मिलिद शंभरकर यांनी लागू केलेला शनिवार आणि रविवारचा लॉकडाऊन हा बंद करण्यात यावा . या निर्बधांना केवळ आमचाच विरोध नसून सर्व व्यापाऱ्यांचा विरोध आहे . बँकांचे हप्ते , कामगारांचा पगार , प्रशासनाचे कर या सर्व गोष्टींचा भार पडून व्यापारी देशोधडीला लागला आहे . त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या आदेशात बदल करण्याची आणि व्यापार पूर्ववत करण्याची मागणी केली आहे .
साध्या आरोग्य विभागा मार्फत प्रतेक दुकानात जाऊन व्यापारी व कामगारांच्या चाचण्या केल्या जात आहेत. वाढत्या रुग्ण संख्येचा विचार करता या मागणीला कितपत यश मिळेल याकडे सर्व व्यापारी व बाजारपेठेचे लक्ष लागलेले आहे
More Stories
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम 2.0 विशेष आरोग्य तपासणी मोहिमेचा शुभारंभ
आमदार निवास व्यवस्था समितीच्या अध्यक्षपदी आमदार सचिन कल्याणशेट्टी