Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > शाळा अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय अभ्यासक्रम

शाळा अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय अभ्यासक्रम

मित्राला शेअर करा

अधिक माहितीसाठी शासनाची अधिकृत वेबसाईट ?

https://kaushalya.mahaswayam.gov.in/users/find_center

अर्धवट शिक्षण सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच विशिष्ठ शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळामार्फत कमी कालावधीचे व्यवसाय अभ्यासक्रम (ॲड ऑन कोर्सेस) चालविण्यात येतात.सध्या मंडळांतर्गत विविध 28 गटातील शैक्षणिक अर्हतेनुसार,तसेच सहा महिने कालावधीचे 156,एक वर्ष कालावधीचे 100 आणि दोन वर्ष कालावधीचे 45 अर्धवेळ (234) व पूर्णवेळ (67) असे एकुण 301 अभ्यासक्रम राबविण्यात येतात.हे अभ्यासक्रम जिल्हा,तालुकास्तरावर तसेच ग्रामीणभागात मंडळाने मान्यता दिलेल्या 1 हजार 269 संस्थांमध्ये राबविण्यात येत आहेत. विशेषत:खेड्यापाड्यातील, गोरगरीब विद्यार्थी मंडळाच्या मान्यताप्राप्त संस्थांमध्ये प्रवेश घेऊन प्रशिक्षण पूर्ण करतात.मंडळाचे अभ्यासक्रम हे रोजगार व स्वयंरोजगारास चालना देण्याच्या दृष्टीने विशेष करुन शाळा अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरत आहेत.