Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > शेतकर्‍याचे हातापाय बांधुन ट्रॅक्टर पळवणारे आरोपी गजाआड

शेतकर्‍याचे हातापाय बांधुन ट्रॅक्टर पळवणारे आरोपी गजाआड

येडशी कुसळंब कुसळंब राज्य मार्गावर पुरी गावच्या शिवारात साई मंदिराजवळ भगवान अंबऋषी दिडवळ यांच्या शेतात नांगरणी करीत असताना आठ – दहा चोरट्यांनी शेतकऱ्यांचे हात – पाय बांधले आणि त्यानंतर बेदम मारहाण करीत ट्रॅक्टरव मोबाईल हँडसेटसह ६ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज पळविला . २३ एप्रिल रोजी मध्यरात्रीतानाजी २३ एप्रिल रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली असून याबाबत जयसिंग मोहन पवार ( ३२ , रा . पुरी ) यांनी फिर्याद दिली . पोलिसांनी १२ तासात या घटनेचा छडा लावत शंकर शिवाजी काळे , रा . तेरखेडा , ता . वाशी , जि . उस्मानाबाद ) या आरोपीस अटक केली . आरोपीला न्यायालयात हजर केले असता २८ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली .
नंतर पुढे तपास करत नितीन बापू पवार,अमोल सर्जेराव काळे या आरोपींना अटक करण्यात आली आहे शुक्रवारी रात्री कुसळंब – येडशी राज्य मार्गावर जयसिंग हे शेतात नांगरणीसाठी ट्रॅक्टर ( एम.एच .१३ , डी . एच . १४१० ) घेऊन आले . रात्री एक वाजण्याच्या दरम्यान नांगरत असताना एक ट्रक रोडच्या बाजूला थांबलेला दिसला . २० ते ३० वयोगटातील आठ- दहा जण खाली उतरून आले . दोघांनी ट्रॅक्टरमधून खाली उतरण्यास सांगत काठीने मारहाण केली.ओरडण्याचा आवाज ऐकून शेतमालक
भगवान दिडवळ हे धावून आले . चोरट्यांनी त्यांनाही पकडून मारहाण केली . त्याने जयसिंग आणि भगवान यांचे हात – पाय आणि डोळ्यावर पट्टी बांधून तोंडात बोळे कोंबले . त्यानंतर ट्रॅक्टर , नांगरसह मोबाईल काढून घेऊन चोरटे पसार झाले.जयसिंग यांनी तोंडालाबांधलेली पट्टी मातीच्या ढेकळात घासून काढली आणि भगवान यांना मोकळे केले . त्यांनी अमर पवार , अशोक पवार , प्रवीण दिडवळ यांना फोनवरून घडलेला प्रकार सांगितला . अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल करीत आहेत.

गुन्ह्याची कबुली .
घटनेनंतर पांगरीचे पोलीस पथक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित धाराशिवकर , सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल हे घटनास्थळी दाखल झाले .

या घटनेनंतर शिराळा येथे नाकेबंदी केली पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोज जाधव , कुणाल पाटील , पांडुरंग मुंडे , तानाजी डाके , सुनील बोधनवाढ , दिगंबर भंडरवाड गणेश घुले , दस हे गस्त घालत असताना शिराळा फाटा येथे शंकर शिवाजी काळे याला ताब्यात घेतले.चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.नंतर नितीन बापू पवार,अमोल सर्जेराव काळे या आरोपींना अटक करण्यात आली आहे.