कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बार्शी शहरातील सरकारी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता पडू नये त्याचप्रमाणे इतर सोयीसुविधा कमी पडू नये यासाठी आमदार राजेंद्र राऊत हे त्यांचा एक कोटी रुपयांचा आमदार निधी देणार असल्याचे बैठकीत जाहीर केले.
आमदार राजेंद्र राऊत यांनी शुक्रवार दिनांक 30 एप्रिल रोजी बार्शी शहरातील सरकारी ग्रामीण रुग्णालयात प्रांताधिकारी हेमंत निकम साहेब, तहसीलदार सुनील शेरखाने साहेब, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ढगे, मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील मॅडम, गटविकास अधिकारी शेखर सावंत, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल बोपलकर मॅडम, डॉ. जयवंत गुंड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे होनमुटे यांच्यासोबत एक संयुक्त बैठक घेऊन या बैठकीत त्यांचा एक कोटी रुपयांचा आमदार निधी देत असल्याचे जाहीर केले.
बार्शी शहर व तालुक्यात वाढत असलेला कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी, रुग्णालय व डॉक्टरांच्या मागणीनुसार आवश्यक ती साधनसामुग्री, उपचार करणारी यंत्रे, ऑक्सिजन पुरवठा इत्यादी गोष्टींकरीता एक कोटी रुपयांचा आमदार निधी वापरण्यात येणार आहे.
या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह येथील कोवीड केअर सेंटरचे रूपांतर 50 बेडचे ऑक्सिजन डेडिकेटेड हाॅस्पीटलमध्ये करून या ठिकाणी शहर व तालुक्यातील गरीब व गरजू रुग्णांना मोफत उपचार देण्याचा विचार विनिमय करून त्या ठिकाणची पाहणी मान्यवरांनी केली.
More Stories
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!
बार्शी येथे मनशक्ती प्रयोग केंद्राची आरोग्यप्राप्ती, रोगमुक्ती कार्यशाळा संपन्न