
देशात सलग दुसऱ्या दिवशी २ लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले आहेत . गेल्या २४ तासात २,१७,३५३ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे . तर ११८५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला . सध्या देशात १५,६९,७४३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत . तर आतापर्यंत देशात कोरोना रुग्ण संख्येच्या स्फोटाने चिंता वाढली आहे . तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ही ८८.१३% गेले आहे ही बाब दिलासा देणारी आहे
महाराष्ट्रात सुद्धा तीच परिस्थिती पाह्यला मिळत आहे १६ एप्रिल रोजी महाराष्ट्रात पुन्हा एकदा ६० हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत . सध्या राज्यात ६,२०,०६० जास्त अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत . त्यामुळे चिंता वाढली आहे . दरम्यान महाराष्ट्रात काही ठिकाणी रुग्णांना बेड्स मिळत नाहीय . ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतोय .इंजेक्शन्स साठी रांगा लागल्याचे चित्र दिसतय तर काही शहरात स्मशानभूमीत रांगा लागल्याच्या बातम्या समोर येत आहेत
आतापर्यंत देशात ११,७२,२३,५०९ लोकांना कोरोना लस देण्यात आली आहे तर राज्यात . कोरोना रुग्ण संख्येच्या स्फोटाने चिंता वाढली आहे .
देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र सातत्याने प्रथम क्रमांकावर असून आज राज्याने त्यात विक्रमी नोंद केली असून आतापर्यंत सुमारे १ कोटीहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. ११ एप्रिल पर्यंत १ कोटी ३८ हजार ४२१ जणांना लस देण्यात आली आहे
More Stories
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मित्र’ संस्थेचे बहुपर्यायी उपक्रम उजनी पर्यटन केंद्र, आयटी पार्क, डाळिंब क्लस्टर, शेंगाचटणी ब्रँडला चालना देण्यावर भर
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक बार्शी शाखेच्या वतीने महाराष्ट्र विद्यालयात गणेश उत्सवानिमित्ताने रंगभरण स्पर्धा संपन्न
कुस्ती स्पर्धेत अगळगाव येथील लोकसेवा विद्यालयाचे चार विद्यार्थी जिल्हा स्तरावर