Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > सलग दुसऱ्या दिवशी चिंताजनक वाढ रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक

सलग दुसऱ्या दिवशी चिंताजनक वाढ रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक

मित्राला शेअर करा
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण☝

देशात सलग दुसऱ्या दिवशी २ लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले आहेत . गेल्या २४ तासात २,१७,३५३ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे . तर ११८५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला . सध्या देशात १५,६९,७४३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत . तर आतापर्यंत देशात कोरोना रुग्ण संख्येच्या स्फोटाने चिंता वाढली आहे . तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ही ८८.१३% गेले आहे ही बाब दिलासा देणारी आहे
महाराष्ट्रात सुद्धा तीच परिस्थिती पाह्यला मिळत आहे १६ एप्रिल रोजी महाराष्ट्रात पुन्हा एकदा ६० हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत . सध्या राज्यात ६,२०,०६० जास्त अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत . त्यामुळे चिंता वाढली आहे . दरम्यान महाराष्ट्रात काही ठिकाणी रुग्णांना बेड्स मिळत नाहीय . ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतोय .इंजेक्शन्स साठी रांगा लागल्याचे चित्र दिसतय तर काही शहरात स्मशानभूमीत रांगा लागल्याच्या बातम्या समोर येत आहेत
आतापर्यंत देशात ११,७२,२३,५०९ लोकांना कोरोना लस देण्यात आली आहे तर राज्यात . कोरोना रुग्ण संख्येच्या स्फोटाने चिंता वाढली आहे .
देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र सातत्याने प्रथम क्रमांकावर असून आज राज्याने त्यात विक्रमी नोंद केली असून आतापर्यंत सुमारे १ कोटीहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. ११ एप्रिल पर्यंत १ कोटी ३८ हजार ४२१ जणांना लस देण्यात आली आहे