
सामाजिक व लोकोपयोगी कामात सतत अग्रेसर असणाऱ्या यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ,बार्शी व राजीव स्मृती बहुउद्देशीय संस्था,बार्शी चे संस्था अध्यक्ष आदरणीय श्री.अरूण (दादा)बारबोले यांच्या वाढदिवसानिमित्त सोजर उद्योग समूह,बार्शी यांच्याकडून ११ जम्बो ऑक्सिजन सिलेंडर ग्रामीण रुग्णालय,बार्शी यांना दादांचे चिरंजीव अर्जुनसिंग(ओम)अरूण बारबोले यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
याप्रसंगी अधिक्षक मा.डाॅ.शितल बोपलकर मॅडम,ॲड.राजश्रीताई डमरे मॅडम,नगरसेवक श्री.कय्युमभाई पटेल, पत्रकार मा.संजय(आबा)बारबोले, मा.उमेश काळे व संस्थेतील पदाधिकारी व जेष्ठ कर्मचारी वृंद उपस्थित होते. प्रास्ताविक श्री.संतोष घावटे यांनी केले.
सध्याच्या कोरोना महामारी परिस्थितीत ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेता सोजर उद्योग समूहा बार्शी चा हा स्तुत्य उपक्रम बार्शी व परिसरातील अनेक रुग्णांचा जीव वाचवण्या कमी येणार आहे त्यांच्या या केलेल्या सहकार्याबद्दल मा.डॉ.बोपलकर,मॅडम यांनी सोजर उद्योग समूहाचे आभार मानले.
More Stories
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांना मिळणार १० दिवसांची अर्जित रजा – माजी आमदार दत्तात्रय सावंत
महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन