सतत सामाजिक कामात मदतीचा हात पुढे असणाऱ्या प्रिसिजन उद्योग समूह परत येकदा सोलापूरकरांच्या मदतीला धावून आला आहे
मोदी स्मशानभूमीतील १९९० साली बसविलेल्या पहिल्या विद्युतदाहिनीच्या दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू झालं आहे. प्रिसिजन कॅमशाफ्ट्सचे चेअरमन श्री. यतिन शहा यांनी जातीने लक्ष घालून या कामासाठी पुढाकार घेतला आहे.
या ठिकाणची पहिली विद्युतदाहिनी बऱ्याच काळापासून बंद होती. सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त श्री. धनराज पांडे यांनी ही विद्युतदाहिनी सुरू करण्यासोबतच स्मशानभूमीच्या आधुनिकीकरणासाठी प्रयत्न सुरू केले होते. कोरोनामुळे मृतांची संख्या वाढत असून फूटाफूटाच्या अंतरावर प्रेतं जाळण्याची वेळ सोलापूरवर ओढावली असल्याच्या बातम्या माध्यमांमधून येत आहेत.
अशा भीषण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर श्री. यतिन शहा यांनी काल आणि आज दोनवेळा स्वतः मोदी स्मशानभूमीत जाऊन पाहणी केली. कालपासून महानगरपालिकेची यंत्रणा ऍक्टिव्ह झाली असून प्रिसिजन’ स्टाईलने अत्यंत वेगवान व नियोजनबद्ध काम सुरू आहे.
More Stories
तृतीयपंथीयांच्या जागतिक परिषदेसाठी बार्शीचे सचिन वायकुळे यांना निमंत्रण
उळे येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली
एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा निकाल तारीख