Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > प्रहार शिक्षक संघटनेच्या लढ्यास यश,शिक्षकांचे पगार राष्ट्रीयीकृत बँकेतून

प्रहार शिक्षक संघटनेच्या लढ्यास यश,शिक्षकांचे पगार राष्ट्रीयीकृत बँकेतून

मित्राला शेअर करा
हालगीनाद आंदोलन २०१९

सोलापूर जिल्हयातील माध्यमिक शाळांच्या शिक्षकांच्या पगारी राष्ट्रीयकृत बँकेत होणेबाबत सोलापूर यांनी सोलापूर जिल्हयातील शिक्षकांच्या पगारी राष्ट्रीयकृत बँकेत होणेबाबत सूचना निर्गमित करण्यात आली आहे
शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन सध्या (D.C.C) जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत केले जाते. प्रहार शिक्षक संघटनेने त्याला विरोध दर्शवत वेतन राष्ट्रीयीकृत बँकमार्फत करण्याची मागणी केली होती.या साठी प्रहार संघटनेने सचिन नागटिळक यांच्या नेतृत्वाखाली हालगीनाद आंदोलनासह अनेक आंदोलने करून पाठपुरावा केला होता
.

दि .३१.०८.२०२० शासन परिपत्रकानुसार शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी यांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेतून व्हावेत असे सुचवले होते
मात्र जिल्हा बँकांच्या राजकीय दबावामुळे त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही.आताही जिल्हा बँकेचे अधिकारी शिक्षक , कर्मचाऱ्यांवर दबाव आणून जैसे ये स्थिती ठेवण्याच्या प्रयत्नात होते,असा आरोप प्रहार शिक्षक संघटनेने केला होता.

मागील काही दिवसापूर्वी फक्त सोलापूर शहरातील शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेतून होतील असे आदेश देण्यात आले त्यामुळे ग्रामीण भागातील शिक्षकांत नाराजी होती तर संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात होत्या

अखेर वेतन व भ.नि.नि. अधीक्षक यांनी आदेश काढून राष्ट्रीयकृत बँकेच्या सुविधा व योजना कर्मचाऱ्यांना अवगत करून द्याव्यात असे सांगितले आहे.