बार्शी येथील धर्मवीर रामभाऊ पवार मार्गावरील वीर सावरकर चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्र राज्य डिजीटल संपादक पत्रकार संघटनेचे बार्शी तालुका सहसचिव पत्रकार धीरज शेळके व हिंदू महासभेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल पवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक तारखेनुसार ६ जून रोजी व तिथीनुसार ज्येष्ठ शुक्लपक्ष त्रयोदशी दिवशी करण्यात आला होता.या दिवसाचे औचित्य साधून वीर सावरकर मित्र मंडळ,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करून त्यांना मानवंदना देण्यात आली.यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले धीरज शेळके यांनी,छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील जनतेसाठी केलेले कार्य स्मरणात ठेवून आपले राष्ट्र एकसंघ ठेवण्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार प्रेरणास्थानी ठेवून आचरणात आणावेत असे म्हटले आहे.यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित अनिल पवार,तात्यासाहेब घावटे, विजय राऊत, डॉ सागर हाजगुडे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक राऊत यांनी केले तर उपस्थितांचे आभार रामराजे बारंगुळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीकांत शहाणे,अतीश बिसेन, अमोल काळे, अमृत शाळू, अभिजित सरवदे, शंकराव काकडे,राजेंद्र काटे,तुषार महाजन,आप्पाजी कांबळे आदींनी परिश्रम घेतले.
विश्वसनीय बातम्या अणि माहिती
More Stories
बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन
पुण्याच्या एमआयटी विद्यापीठाचा जेष्ठ संपादक राजा माने यांना ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर