Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > कोरोना अपडेट > परांड्यासाठी 100 खाटांचे स्त्री रूग्णालय मंजूर

परांड्यासाठी 100 खाटांचे स्त्री रूग्णालय मंजूर

परांड्यासाठी 100 खाटांचे स्त्री रूग्णालय मंजूर
मित्राला शेअर करा

आरोग्यमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांची महाआरोग्य शिबिरा निमित्त भेट
उस्मानाबाद :- उस्मानाबाद जिल्ह्य़ातील परांडा येथे 100 खाटांच्या स्त्री रूग्णालयास महाराष्ट्र शासनाने विशेष बाब म्हणून मंजूरी दिली असून आरोग्यमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी महाआरोग्य शिबिराच्या पूर्वसंध्येस मतदार संघातील जनतेला भेट दिली आहे.
उस्मानाबाद जिल्हा हा आकंक्षित जिल्हा असल्याने या जिल्ह्य़ात आरोग्य सुविधा ह्या अपुरया पडू लागल्याने विशेषतः महिलांच्या आरोग्या बाबत अडचणी येत असल्याने राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी परांडा येथे 100 खाटाचे स्त्री रुग्णालयाचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला, हा प्रस्ताव आरोग्य विभागाकडून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कडे पाठविण्यात आला, आकंक्षित जिल्हा म्हणुन या प्रस्तावास विशेष बाब म्हणून मंजुरी देण्यात आली. ही मंजूरी देताना या रूग्णालयासाठी लागणारे मनुष्यबळ यास नियमानुसार मान्यता दिली आहे.


दरम्यान परांडा तालुक्यात स्त्री रूग्णालयास मंजूरी मिळाल्याने या भागातील महिलांच्या आरोग्याच्या प्रश्नावर तोडगा निघाला असल्याची भावना या तालुक्यातील जनतेची असून माताभगिनींचे आरोग्य आता सुदृढ नक्कीच होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

माझ्या माताभगिनी आता सुदृढ होतील- आरोग्य मंत्री सावंत
राज्याच्या आरोग्यमंत्री झाल्या बरोबर मायमाऊलीच्या आरोग्‍याचा विचार करून माता सुरक्षित तर घर सुरक्षित हे अभियान राबविले आणी चार कोटी पेक्षा जास्त मायमाऊलींची मोफत आरोग्य तपासणी केली. याच धर्तीवर माझ्या मतदारसंघातील मायमाऊलीही कायम सुदृढ राहावी, ती सुदृढ राहीली तर घर सुदृढ होईल, घरा बरोबरच गाव, शहर, जिल्हा, आणी पर्यायांने राज्य व देश सुदृढ होईल. याच उद्देशाने परांडा येथे शंभर खाटाचं स्त्री रूग्णालय मंजुर करून घेतल्याच आरोग्य मंत्री सावंत यांनी सांगून आपलं एक स्वप्न पूर्ण झाले असे त्यांनी यावेळी सांगितले.

आरोग्य व्यवस्थेला बळ मिळाले- डाॅ.आर.व्ही.गलांडे जिल्हा शल्यचिकित्सक उस्मानाबाद
उस्मानाबाद जिल्ह्य़ातील आरोग्य व्यवस्था पाहता या जिल्ह्य़ातील परांडा सारख्या तालुक्यात सक्षम आरोग्‍य यंत्रणा अत्यावश्यक होती, या भागातील नागरिकांची सक्षम आरोग्य यंत्रणा नसल्या कारणाने काही अंशी अडचण येत होती. यावर आरोग्यमंत्री सावंत यांनी पुढाकार घेऊन शंभर खाटाचे स्त्री रूग्णालय मंजूर करून जिल्ह्य़ातील आरोग्य व्यवस्थेला बळ दिले आहे,ग्रामीण भागात स्त्री रूग्णालय उभारून ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्यासाठी मोठी आणी प्रभावी कायमस्वरूपी उपाययोजना या माध्यमातून झाली आहे. त्यामुळेच या भागातील नागरिकांना निरामय आरोग्य मिळू शकेल असा मला विश्वास आहे…!