Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > मनोरंजन > सर्वांच्या सहकार्यातून सोलापूरचे 100 वे नाट्यसंमेलन देशभरात पथदर्शक ठरेल -पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

सर्वांच्या सहकार्यातून सोलापूरचे 100 वे नाट्यसंमेलन देशभरात पथदर्शक ठरेल -पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

सर्वांच्या सहकार्यातून सोलापूरचे 100 वे नाट्यसंमेलन देशभरात पथदर्शक ठरेल -पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
मित्राला शेअर करा

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईच्या शतक महोत्सवी विभागीय मराठी नाट्य संमेलनाच्या कार्यालयाचे नाट्य व सिने कलावंत भाऊ कदम यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ पार पडला

सोलापूर येथे नॉर्थकोर्ट प्रशालेच्या प्रांगणात दिनांक 20 ते 25 जानेवारी 2024 मध्ये होणाऱ्या शंभराव्या नाट्य संमेलनास नाट्य कलावंतांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.

या नाट्य संमेलनासाठी प्रख्यात सिने अभिनेते अमिताभ बच्चन यांना आमंत्रित करण्यात येणार येणार असून

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने राज्यातील सहा महसूली विभागात शतक महोत्सवी विभागीय नाट्य संमेलने आयोजित केली जात आहेत. परंतु पुणे विभागात पिंपरी चिंचवड व सोलापूर येथे हे नाट्यसंमेलन आयोजित केले जाणार असून, सोलापूरचे नाट्य संमेलन दिनांक 20 ते 25 जानेवारी 2024 या कालावधीत होणार आहे. हे नाट्यसंमेलन 100 वे असल्याने सर्व सोलापूरकरांच्या सहकार्यातून दर्जेदार नाटकासह येथे येणाऱ्या सर्वांना उत्कृष्ट सोयी सुविधा देऊन संपूर्ण देशभरात आदर्शवत ठरेल असे संमेलन केले जाणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.नॉर्थ कोर्ट प्रशाला येथे शतक महोत्सवी विभागीय नाट्य संमेलनाच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री तथा नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष चंद्रकांत पाटील बोलत होते.यावेळी आमदार सुभाष देशमुख,नाट्य व सिने अभिनेता भाऊ कदम,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रकाश महानवर, माजी आमदार तथा संमेलनाचे कार्य अध्यक्ष प्रकाश यलगुलवार,विजय साळुंखे,तेजस्विनी कदम,प्रशांत बडवे,मोहन डांगरे व अन्य मान्यवर उपस्थित होते.


पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, सोलापूर येथे यापूर्वीही संमेलने झालेली आहेत त्यामुळे सोलापूरकरांना उत्कृष्ट नियोजनाचा चांगला अनुभव असल्याने हे शंभरावे नाट्यसंमेलन अशा पद्धतीने करावे की त्याची देशभरात दखल घेतली जाईल. यापुढे झालेली व पुढील काळात होणारी सर्व नाट्य संमेलनात सोलापूर येथे झालेल्या व येथे पाहुण्यांचे केलेले आदरतिथ्य व दिलेल्या सर्व सोयी सुविधा याची दखल नाट्यसंमेलनानी घेतली पाहिजे तसेच ते देश पातळीवर आदर्शवत ठरले पाहिजे यासाठी सर्वांच्या सहकार्यातून प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.