Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > मनोरंजन > महाराष्ट्र ढोल पथक महासंघाच्या सोलापूर जिल्हा प्रमुख शिलेदारपदी श्रीकांत जिठ्ठा आणि प्रविण परदेशी यांची निवड

महाराष्ट्र ढोल पथक महासंघाच्या सोलापूर जिल्हा प्रमुख शिलेदारपदी श्रीकांत जिठ्ठा आणि प्रविण परदेशी यांची निवड

मित्राला शेअर करा

सोलापूर : महाराष्ट्र ढोल पथक महासंघाच्या सोलापूर जिल्हा प्रमुख शिलेदारपदी शिवम ढोल-ताशा पथक, सोलापूरचे श्रीकांत जिठ्ठा आणि कर्मवीर ढोल-ताशा ध्वज पथक, बार्शीचे प्रविण परदेशी यांची निवड मुंबई येथील बैठकीत करण्यात आली. या निवडीची अधिकृत घोषणा महाराष्ट्र ढोल पथक महासंघाचे प्रमुख सुभाष लाडे यांनी केली.

जिठ्ठा आणि परदेशी यांच्या निवडीमुळे सोलापूर जिल्ह्यातील ढोल-ताशा पथकांच्या संघटनात्मक बांधणीस चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असलेल्या ढोल-ताशा पथकांना खेळाचा दर्जा मिळावा, गणेशोत्सव, गुढीपाडवा, शिवजयंती यांसारख्या सणांमध्ये उत्साहाने वाजवले जाणारे ढोल-ताशा हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून शारीरिक मेहनत, ताल-लय, गती, सहकार्य आणि शिस्त या गुणांवर आधारित एक कला व कौशल्यपूर्ण उपक्रम आहे. महाराष्ट्रातील हजारो युवक या पारंपरिक कलेत स्वतःला झोकून देतात. सततचा सराव, शारीरिक तंदुरुस्ती, सांघिक समन्वय आणि मानसिक तग धरण्याची क्षमता हे या उपक्रमाचे महत्त्वाचे पैलू आहेत. त्यामुळेच इतर पारंपरिक खेळांप्रमाणे ढोल-ताशा पथकांनाही ‘खेळाचा दर्जा’ मिळावा तसेच, जर ढोल-ताशा पथकांना क्रीडा प्रकाराचा दर्जा मिळाला, तर या कलेसह तरुणांना अधिक चांगल्या संधी मिळतील, तसेच शासनाकडून प्रोत्साहन, शिष्यवृत्ती, स्पर्धा आणि खेळाडूंसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ मिळू शकेल. यासाठी महासंघाचे प्रमुख सुभाष लाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रयत्न करणार असल्याचे जिठ्ठा आणि परदेशी यांनी सांगितले.

या नियुक्तीबद्दल श्रीकांत जिठ्ठा आणि प्रविण परदेशी यांचे ढोल-ताशा पथकांसह विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.