ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स क्लब,बार्शी (संचलित) विश्वजीत रोलर स्केटिंग क्लासेस, बार्शी येथे प्रशिक्षण घेतलेल्या कु. संचिती भगवान जाधव हिने 19 वर्षा खालील गटात इनलाईन स्केटिंग स्पर्धेत पहिला क्रमांक मिळविला आहे.

लातूर जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शालेय रोलर स्केटिंग स्पर्धेत रिलायन्स काॅलेज, लातूर ची विद्यार्थिनी कु. संचिती भगवान जाधव हिने 19 वर्षा खालील गटात इनलाईन स्केटिंग स्पर्धेत पहिला क्रमांक मिळविल्या बद्दल तिचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
संचिती ला संस्थेचे अध्यक्ष भगवान जाधव सर, उपाध्यक्ष गणेश रोडे सर,सचिव सौ.सविता जाधव मॅडम, प्रा. अविनाश जाधव सर, तेजस जाधव सर, क्रिडा शिक्षक पटवारे सर , योगेश जाधव सर,सौ. स्नेहल रोडे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
More Stories
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वाहने उभा करून माननीय उपमुख्यमंत्री महोदय श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे चालत निघाले
गरीब रूग्णांना रूग्णालयात उपचारासाठी धर्मादाय योजनेतर्गंत रूग्णालयांची नावे जाहीर