त्यानुसार यावर्षीही रविवार दिनांक ३० जानेवारी, २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात यावा, असे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहे.
रविवार, दि. ३० जानेवारी, २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता पाळण्यात यावयाच्या मौन (स्तब्धता) ची सुरुवात होण्यापूर्वी सकाळी १०.५९ पासून ११.०० वाजेपर्यन्त इशारा भोंगा वाजविण्यात येईल. हा इशारा भोंगा संपल्यानंतर सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये/आस्थापना/शैक्षणिक संस्था/ विद्यापीठे यामधील अधिकारी/कर्मचारी/शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी तसेच नागरिक आदी सर्वांनी दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळावे, सकाळी ११.०२ मिनिटांनी मौन (स्तब्धता) संपल्यासंबंधीचा इशारा भोंगा सकाळी ११.०३ मिनिटांपर्यंत वाजविण्यात येईल.
जेथे भोंग्याची व्यवस्था नसेल तेथे वरीलप्रमाणे सकाळी ११.०० वाजता मौन (स्तब्धता) पाळण्याबाबत योग्य ते निर्देश संबंधितांना देण्यात यावेत व हुतात्म्यांना आदरांजली गंभीरपणे व योग्य त्या आदराने मौन (स्तब्धता) पाळून देण्यात येईल याची दक्षता घेण्यात यावी.असे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहे.
More Stories
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ या मतदान जनजागृतीचा उद्या राज्यस्तरीय शुभांरभ