गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल पाहायला मिळत आहे. राज्यात काही भागात नागरिक वाढत्या तापमानाने त्रस्त असताना काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

येत्या 48 ते 72 तासांमध्ये मान्सून (monsoon) केरळ मध्ये लावेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रात 30 मे रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला. मान्सूनपूर्व पावसामुळे,सोयाबीन, द्राक्ष, आंबा पिकाचं मोठं नुकसान झालं.
महाराष्ट्रात साधारण 7 ते 10 जूनच्या दरम्यान मोसमी पावसाचे आगमन होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, वेळेआधीच मान्सून धडकणार असल्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा आहे.
More Stories
भविष्यवेधी शिक्षण काळाची गरज
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांना मिळणार १० दिवसांची अर्जित रजा – माजी आमदार दत्तात्रय सावंत
महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश