दिनांक २८ जानेवारी ते १ फेब्रुवारीजानेवारी २०२५ वार या कालावधीमध्ये ५२ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन डॉ पंजाब देशमुख विज्ञान नगरी, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती या ठिकाणी पार पडले.

या प्रदर्शनामध्ये राज्यातून आलेल्या विद्यार्थ्यांनी प्रयोगाचे सादरीकरण केले.या मध्ये महाराष्ट्र विद्यालयातील माध्यमिक गटातून चौथा क्रमांक मिळवत चि तनवीर जमील तांबोळी यांने यश संपादन केले. या विद्यार्थ्याला संग्राम देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल तनवीर चे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष एन. एन. जगदाळे, संस्थेचे सचिव तथा शाळा समितीचे अध्यक्ष पी. टी. पाटील, सहसचिव तथा शाळा समितीचे सदस्य ए. पी. देबडवार, संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ मिराताई यादव, एस .बी. शेळवणे, सर्व कार्यकारिणी सदस्य, सर्व संस्था सदस्य, विद्यालयाच्या प्राचार्या के. डी. धावणे, उपमुख्याध्यापक आर. बी. सपताळे,पर्यवेक्षक एस. सी. महामुनी,पर्यवेक्षिका एन.बी. साठे, विज्ञान प्रमुख एस. एम. हाजगुडे, सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
More Stories
मातृभूमी प्रतिष्ठानच्या इनडोअर स्टेडियमचे भूमिपूजन मोठ्या हर्ष उल्हासात संपन्न
तेर येथील जिप उर्दू शाळेत उद्या बाल आनंद मेळाव्याचे आयोजन, सहभागी होण्याचे मुख्याध्यापक शहा तय्यबअली महेबुब यांचे आहवान
राज्यस्तरीय सीनियर वुशू अजिंक्यपद स्पर्धेत कु. नेहा घाडगे तृतीय