Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > जिप उर्दू शाळेतील बाल आनंद मेळाव्यात 90 हजारांची उलाढाल; विविध स्वादिष्ट खाद्य पदार्थांवर विद्यार्थ्यांसह पालकांनी मारला ताव

जिप उर्दू शाळेतील बाल आनंद मेळाव्यात 90 हजारांची उलाढाल; विविध स्वादिष्ट खाद्य पदार्थांवर विद्यार्थ्यांसह पालकांनी मारला ताव

जिप उर्दू शाळेतील बाल आनंद मेळाव्यात 90 हजारांची उलाढाल; विविध स्वादिष्ट खाद्य पदार्थांवर विद्यार्थ्यांसह पालकांनी मारला ताव
मित्राला शेअर करा

तेर प्रतिनिधी :- हरी खोटे, धाराशिव तालुक्यातील तेर येथील पी.एम.श्री जिल्हा परिषद उर्दु प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये दिनांक १ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या बाल आनंद मेळाव्यात शालेय विद्यार्थ्यांनी ५१ स्टॉल उभारले त्यातून ९० हजार रूपयांची उलाढाल झाली विशेष म्हणजे बाल आनंद मेळाव्यात शालेय विद्यार्थ्यांनी बनवून विक्रीसाठी ठेवलेल्या विविध खाद्यपदार्थांवर शालेय विद्यार्थ्यांसह पालकांनी तसेच प्रमुख पाहुण्यांनी ताव मारला.

विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनात मनावरील असलेला अभ्यासक्रमाचा मानसिक ताण तणाव दूर करुन विरंगुळा मिळावा व त्यांच्यातील अंगीकृत सुप्त कलागुणांना वाव देता यावा तसेच प्रत्यक्ष कृतीतून व्यवहार ज्ञानाचे शिक्षण देण्यासाठी तेर ता धाराशिव येथील जिल्हा परिषद उर्दु शाळेत शनिवार दिनांक १ फेब्रुवारी रोजी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते

या मेळाव्याचे उद्घाटन गट शिक्षणाधिकारी हाजी सय्यद असरार अहेमद यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार अधिकारी रामचंद्र शिंदे, मधुकर तोडकर, हे उपस्थित होते जि.प.उर्दू शाळेत विध्यार्थ्यांनी खरी कमाई उपक्रमाचे आयोजन केले होते या उपक्रमात विविध प्रकारचे ५१ विक्री स्टाँल उभारले होते. शाकाहारी मांसाहारी स्टाँल वरून विध्यार्थी पालक शिक्षक यांनी खरेदी करून पदार्थांचा आस्वाद घेत होते.


वेळी समितीच्या अध्यक्षा शेख परवीन समद उपाध्यक्ष मुकतार काझी ग्रामपंचायत सदस्य बापूराव नाईकवाडी शिक्षण तज्ञ सदस्य जुनेद मोमीन, खालेद काझी अर्शद मुलांनी शाकेर मुलांनी, मुस्कान मुलानी, रेश्मा रियाज कबीर, मुझम्मिल काझी, शाळेचे मुख्याध्यापक तय्यब अली शहा उपस्थित होते.


शाळेचे शिक्षक मो. इकबाल अली , मोमिन कलीम, फुलमामडी तौफीकुलआलम, चौधरी शमसोद्दीन, खतीब मुमताज, अर्शिया शेख, अन्सारी एखलास, रेश्मा शहा, मौला शेख यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले प्रस्तावना शाळेचे मुख्याध्यापक तय्यबअली शहा यांनी केली तर सूत्रसंचालन मौला सर यांनी केले.