तेर प्रतिनिधी – हरी खोटे :-राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी सचिन देवकते यांची पक्षश्रेष्ठींकडून निवड करण्यात आल्याने देवकते यांचे अभिनंदन केले जात आहे.

तेर ता धाराशिव येथील सचिन देवकते हे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय समाज पक्षांसाठी प्रामाणिकपणे काम करत असून पक्षाच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत असतात यावेळी सचिन देवकते यांच्या कामाची दखल घेऊन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर, प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते, मुख्यमहासचिव माऊली सलगर, मराठवाडा अध्यक्ष अश्रुबा कोळेकर, यांच्या आदेशानुसार सचिन देवकते यांची राष्ट्रीय समाज पक्षाच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देवकते यांना नियुक्तीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी देवकते यांच्या निवडीबद्दल तेर ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला
More Stories
गुन्हा सिद्ध करण्यासाठी ‘लॅब ऑन व्हील’, महाराष्ट्र हे देशातील मोबाईल फॉरेन्सीक व्हॅन सुरू करणारे पहिले राज्य
कै. सुभाष गणपत काळे यांच्या स्मरणार्थ सचिन वायकुळे यांना यावर्षीचा सामाजिक गौरव पुरस्कार जाहीर
दिव्यांगांसाठी महामंडळाची ‘शॉप ऑन ई- व्हेईकल योजना’, 10 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन