सरकारने आपल्या गावांसाठी किती निधी वितरित केला आहे व कोणती कामे केली हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. व ते तुमच्या मोबाईलवरून किती निधी आला व किती कामे झाले हे आपण बघू शकता.
ग्रामपंचायतचा निधी किती आला हे पाहण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दि. 24 एप्रिल 2020 रोजी e Gram Swaraj Portal हे ॲप लॉन्च केले.
इ ग्राम स्वराज पोर्टल ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://play.google.com/store/apps/details?id=nic.in.unified
ग्रामपंचायतसाठी वित्त आयोगाच्या माध्यमातून 861 कोटी निधी वितरित करण्यात आला आहे. तसेच सर्व लाभार्थी ग्रामपंचायतची यादी देखील आलेली आहे. आपल्या ग्रामपंचायतसाठी किती निधी आला, हे पाहून घ्या. 2021-22 ला संस्थांना वितरित करण्यासाठीच्या संबंधित निधीच्या दुसऱ्या हप्त्याबाबत रु. 861.40 कोटी इतका निधी निर्गमित केला आहे. असे शासन निर्णयाद्वारे कळविले आहे.
या निर्णयानुसार 15 व्या केंद्रीय वित्त आयोगाकडून राज्य सरकारला पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाचा सन 2021-22 आर्थिक वर्षाचा अबंधित निधीचा दुसऱ्या हप्त्याचा केंद्र सरकारकडून रु. 861.40 कोटी एवढा निधी महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थाना जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत या तीन स्तरांसाठी निधी वितरित करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. (gram panchayat yojana 2022 maharashtra)
हा निधी 10:10:80 या प्रमाणात अनुक्रमे पंचायत राज संस्थाना जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांना वितरित करण्यात येणार आहे. (gram panchayat yojana)
More Stories
बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन
पुण्याच्या एमआयटी विद्यापीठाचा जेष्ठ संपादक राजा माने यांना ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर