Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > ९ ऑक्टोबर जागतिक टपाल दिन वाकडी येथे उत्साहात साजरा

९ ऑक्टोबर जागतिक टपाल दिन वाकडी येथे उत्साहात साजरा

मित्राला शेअर करा

सविस्तर वृत्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व वृक्षसंवर्धन समिती,वाकडी ता. परंड यांच्या संयुक्त विदयमाने जागतिक टपाल दिन साजरा केला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून टपाल संग्राहक वृक्षमित्र श्री उदयजी पोतदार तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक धनंजय जगताप, जालिंदर रगडे, तानाजी पाटील,ग्रामपंचायत सदस्य वृक्षमित्र अरविंद रगडे, वृक्षमित्र बंडू रगडे,गणेश लोंढे,जयवंत पाटील,अभय पाटील,महादेव शिवणगी शाळेतील शिक्षक,शिक्षिका व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

यावेळी वाकडी पोस्ट ऑफिस चे कर्मचारी पोस्ट मास्तर श्री लक्ष्मण नरसाळे आणि पोस्टमन श्री रामभाऊ कारभारी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना श्री दत्तात्रय करळे सर यांनी जुन्या काळातील पत्राचे महत्व आणि बरेच किस्से सांगितले आणि विद्यार्थ्यांनी पत्रलेखनाचा छंद जोपासावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री उदयजी पोतदार यांनी मनोगत व्यक्त करताना त्यांच्या तिकीट संग्रहा विषयी माहिती देऊन पत्र,आंतर -देशीय कार्ड आणि पोस्ट ऑफिस चे महत्व सांगून आयोजकांचे कौतुक केले. आणि जीवनामध्ये प्रत्येकाने एक तरी छंद जोपासावा असे आवाहन केले.
त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सहशिक्षक श्री नलवडे सर यांनी एका झाडाचे -मानवास पत्र लिहिले होते त्याचे वाचन पोस्टमन यांचा गणवेश घालून विद्यार्थ्यांसमोर केले.

वृक्षमित्र जयवंत पाटील यांनी लिहिलेल्या एका जुन्या-जाणत्या वटवृक्षाचे मानवास पत्राद्वारे आवाहन हे पत्र लिहिले होते त्याचे वाचन पाटील यांनी केले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नलवडे सर यांनी केले आणि आभार प्रदर्शन श्री गलांडे सर यांनी केले.