सततचा पाऊस दुष्काळ शेतीमालाचे सतत पडणारे भाव प्रत्येक शेतीमाल आयात निर्यात व जागतीक बाजारातील कमी जास्त होणाऱ्या दरामुळे शेतीमालाच्या किंमतीत घसरण आदी कारणाने महाराष्ट्रातील शेतकरी कष्ट करुन सुध्दा अडचणीत येत असल्याने महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमुक्त त्यांचा उतारा कोरा झाला पाहिजे यासाठी आमदार राजेंद्र राऊत यांनी पुढाकार घेत सर्व तिन्ही पक्षाच्या आमदारासह येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करणार असल्याची माहिती दिली.
याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना आमदार राऊत म्हणाले की सोयाबिन, कांदा, ज्वारी, गहु व काही वेळा तुर, हरभरा, उडीद, मुग यांच्या दरात वेळोवेळी घसरण झालेली आहे. दुध उत्पादक, भाजीपाला उत्पादक, फळ उत्पादक व शेतकरी अडचणीत आहेत यासह मुलांच्या शिक्षणाची होणारी हेळसांड शेतकरी कुटुंबातील मुलांच्या लग्नाची होणारी अडचण या सर्व गोष्टीचा विचार करता शेतकरी कष्ट करुन सुध्दा अडचणीत येत आहेत.
आपण यापुर्वी विज बिल माफ करुन शेतकऱ्यांना दिलासा दिलेली आहे.
मात्र, शेतकऱ्यांना कर्जाचा पाशातुन बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांची संपुर्ण कर्ज माफ करुन त्यांचा सात बारा उतारा कोरा करण्यात यावा यासाठी आमदार राऊत यांनी पुढाकार घेऊन सत्ताधारी तिन्ही पक्षातील आमदारांसह येत्या दोन तीन दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची भेट घेऊन मागणी करणार असल्याचे आमदार राऊत यांनी सांगितले.
More Stories
तृतीयपंथीयांच्या जागतिक परिषदेसाठी बार्शीचे सचिन वायकुळे यांना निमंत्रण
एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा निकाल तारीख
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त भव्य रक्तदान व आरोग्य शिबीराचे आयोजन