बार्शी : बार्शीतील दिवंगत निवृत्त उपजिल्हाधिकारी वसंतराव पवार यांच्या निवासस्थानी रविवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सदिच्छा भेट देऊन संपूर्ण परिवाराची आस्थेने विचारपूस केली. यावेळी शरद पवार यांनी आवर्जून दिवंगत वसंतराव पवार यांची आठवण काढली. रविवारी शेतकरी संवाद मेळाव्याच्या निमित्ताने पवार बार्शीत आले होते. त्यावेळी त्यांनी भेट देत १९८९ पासून असलेल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
पवार यांच्या घराण्यात घरात कोणत्याही प्रकारची राजकीय परिस्थिती किंवा वातावरण नसतानाही ३४ वर्षांपासून शरद पवार बार्शीत आल्यानंतर या ठिकाणी थांबतात. यावेळी पवार कुटुंबीयाकडूनही त्यांचे स्वागत पत्रकार उमेश पवार यांनी केले. बार्शीच्या स्वर्गीय वसंतराव पवार यांनी महसूल प्रशासनात आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला होता. सोलापूर, सांगली, अक्कलकोट येथे तहसीलदार म्हणून तर सोलापूर आणि रत्नागिरी येथे त्यांनी उपजिल्हाधिकारी म्हणून सेवा बजावून १९८९ मध्ये ते निवृत्त झाले होते. शरद पवार मुख्यमंत्री असल्यापासून दोघांचे संबंध जोडले गेले होते. रविवारीही शरद पवार यांनी ही प्रथा सुरूच ठेवल्याचे दिसून आले.
बार्शीत शरद पवार आल्यानंतर मोठ-मोठ्या नेत्यांच्या घरी जाऊन ते गाठीभेटी घेत असतात. २०२१ मध्ये वसंतराव पवार यांचे निधन झाल्यानंतरही जुन्या आठवणींना उजाळा देत शरद पवार यांनी रविवारी पवार परिवाराची आवर्जून भेट घेत कुटुंबातील सर्वांची आपुलकीने विचारपूस केली.
यावेळी कुटुंबातील पत्रकार उमेश पवार, जावई रेवणकुमार मोरे, विनोद पवार, सिंधू मोरे, श्वेता पवार, वर्षा पवार, समीक्षा पवार, क्षितिजा पवार, संस्कृती पवार, आरोही पवार, सुरभी पवार, मनस्वी पवार आणि सह्याद्री पवार उपस्थित होते.
More Stories
लोकसेवा विद्यालयाच्या आदर्श कोल्हे याची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड
एसटीच्या नव्या लालपरीचा लूक अखेर आला समोर
शनिवारी १४ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परंड्यात