Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > खरीप २०२३ पीक विम्याबाबत १५ ऑगस्ट नंतर दिल्लीत बैठक.. जिल्ह्यासह देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी प्रयत्न

खरीप २०२३ पीक विम्याबाबत १५ ऑगस्ट नंतर दिल्लीत बैठक.. जिल्ह्यासह देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी प्रयत्न

खरीप २०२३ पीक विम्याबाबत १५ ऑगस्ट नंतर दिल्लीत बैठक.. जिल्ह्यासह देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी प्रयत्न
मित्राला शेअर करा

धाराशिव तालुक्यातील कोंड येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न झाले.याप्रसंगी आमदार पाटील यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधला.

खरीप २०२३ मध्ये पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना २५% अग्रिम भरपाई मिळाली असून इतर २५ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना नुकसानी प्रमाणे विमा मिळाला आहे. मात्र ३२ मंडळातील शेतकरी अद्याप वंचित असून १५ ऑगस्ट नंतर दिल्लीत त्यासंबंधी बैठक घेण्यात येणार आहे. त्यामुळे केवळ कोंड गावातीलच नव्हे तर जिल्ह्यातील आणि देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांनाही लाभ मिळवुन देण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत.

उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देशाचे कृषी मंत्री ना.श्री.शिवराजसिंह चौहान साहेब यांच्याशी बोलणे झालेले असून त्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत आहोत.

जिल्हयातील विकास कामांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. शेतकर्‍यांना केवळ एक रूपयात पीकविमा देण्याची योजना सरकारने आणली. यामुळे एकट्या कोंड गावातील शेतकऱ्यांचे या योजनेमुळे जवळपास १५ लाख रूपये राज्य शासनाने वाचविले आहेत.

शाश्वत सिंचनासाठी ११,५०० कोटी रूपयांचा निधी कृष्णा मराठवाडा प्रकल्पास मंजूर करण्यात आला आहे. संपूर्ण जिल्ह्याची ओळख बदलणाऱ्या या प्रकल्पाचा पहिला टप्पा काही दिवसांत पूर्णत्वास जाणार आहे. माजी मंत्री आदरणीय डॉ.पद्मसिंहजी पाटील साहेब यांच्या दूरदृष्टी मुळेच असे प्रकल्प मार्गी लागत आहेत. राज्य शासनाकडून हे प्रकल्प प्राधान्याने पूर्णत्वास नेले जात आहे. यामुळे जिल्ह्याची नवी ओळख निर्माण होणार आहे.

विरोधकांनाही विचारा लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला का ?

गावातील आपल्या विरोधकांना विचारा लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला की नाही? अनेकांनी तो भरला असेलच. याचा अर्थ राज्य सरकारने सुरू केलेल्या योजनेवर आपल्या विरोधकांचाही विश्वास आहे. मागील अनेक वर्षांपासून मध्य प्रदेशमध्ये ही योजना यशस्वीपणे सुरू आहे. आपल्याकडेही ती यशस्वी होणार आहे. योजनेला मिळणारा प्रतिसाद सर्व काही स्पष्ट करणारा आहे..